Nagpur News : राज्य विधिमंडळाचे उद्यापासून उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Marathi News)
मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर कठोर टिका केली. ते म्हणाले, अनिल देशमुख यांचे दिवस आता संपले आहेत. त्याचं राजकारण मला संपतना दिसत आहे. त्यांची ही शेवटची निवडणूक असेल, कारण त्यांचे राजकारण संपले आहे, अशा शब्दांत मंत्री महोदयांनी देशमुखांवर देशमुखांवर निशाणा साधला.
शरद पवार गटाचे आमदार कार्यालयात आमच्याबरोबर आले तर त्यांच्यासोबत सोबत राहू. मला वाटतं शरद पवार गटाचे आमदार आमच्या पक्षात येतील. आमच्या आमदारांचा आकडा हा 45 होऊन, आमची विधानसभेतील ताकद वाढेल. काही आमदारांना यायला वेळ लागेल पण, ते निश्चितच आमच्याकडे येतील. वानखेडेमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेईल हा निवडणुकीचा नंतरचा भाग आहे. जे सक्षम असेल, त्या परिस्थितीनुसार निर्णय होईल. आम्हाला देखील वाटतं की आमचे नेते अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, असे मंत्री आत्राम म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.