Baba Gujar : अजितदादांना अडचणीत आणणाऱ्या बाबा गुजरांना राष्ट्रवादी नेत्याची तंबी!

NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही बाबा गुजर नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या अशाच बेलगाम वक्तव्यांमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचा वाद होत होता.
Baba Gujar-Ajit Pawar
Baba Gujar-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 28 June : आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या विरोधात जाहीर वक्तवे करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणणारे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांना तंबी देण्याचे निर्देश मुंबईतून देण्यात आले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी कोणालाच विश्वासात घेतले नव्हते. परस्पर ‘व्यवहार' केले. त्यांच्या कार्यशैलीवर जिल्ह्यातील पदाधिकारीसुद्धा नाराज आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वरिष्ठ मंत्री जिल्हाध्यक्षांच्या पत्राला मान देत नाही. केराची टोपली दाखवात. किमान जिल्हाध्यक्षांच्या पत्राचा तरी मान ठेवावा, अशी अपेक्षा अजितदादांकडून (Ajit Pawar) आहे. मंत्री आमचाच मान ठेवत नसतील तर कार्यकर्ते आमची काय इज्जत करणार, असे जाहीर वक्तव्य बाबा गुजर (Baba Gujar) यांनी केले होते.

अजितदादा आणि प्रफुल पटेल यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहिले. मात्र, जेव्हा संविधानिक पदाची जबाबदारी देण्याची वेळ येते, तेव्हा विदर्भाकडे दुर्लक्ष केले जाते. आमचा विचार केल जात नाही. विदर्भात कार्यकर्ते टिकवायचे असतील आणि त्यांच्यात चैतन्य आणायचे असेल तर विधान परिषदेत पूर्व विदर्भातील एखाद्याला उमेदवारी द्यायला हवी.

अर्थमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन समितीला निधी देण्याची जबाबदारी अजित पवार यांची आहे. नागपूर जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादीचे सहा सदस्य आहे. मात्र, स्थानिक नेते म्हणून विचारणा केली जात नाही असेही ते म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल पक्षाच्या वतीने घेण्यात आली आहे. प्रदेश सचिव शिवाजीराव गर्जे यांनी त्यांना तंबी देण्याचे निर्देश प्रदेश उपाध्यक्षांना दिले आहेत.

Baba Gujar-Ajit Pawar
NCP MLA Meet Jayant Patil : होय, आमचे आमदार जयंत पाटलांना भेटले; पण... राष्ट्रवादी नेत्याचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही बाबा गुजर नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या अशाच बेलगाम वक्तव्यांमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचा वाद होत होता.

अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर गुजर यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार गटात सहभागी व्हायचेच होते. नागपूर जिल्ह्यातून अजितदादा यांच्यासोबत जाणारे ते पहिले पदाधिकारी होते. त्यांची अजित पवार गटाच्या वतीने तत्काळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Baba Gujar-Ajit Pawar
VIDEO Chandrakantdada On Anil Parab : चंद्रकांतदादांनी परबांचे पेढे ॲडव्हान्समध्ये वाटले; मुंबई पदवीधरमध्ये भाजपने पराभव मान्य केला का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com