Pune Assembly Election 2024 : पुण्यात ठाकरे, काँग्रेस अन् राष्ट्रवादी 'एवढ्या' जागांवर लढणार, महाविकास आघाडीचं सूत्र ठरलं?

Mahavikas Aghadi Assembly Election 2024 : सध्या जागा वाटपाबाबतची अधिकृत चर्चा जरी सुरू झाली नाही. तरी प्राथमिक चर्चा मात्र झाल्या आहेत. त्यानुसार काही बेसिक फॉर्म्युले समोर आले आहेत.
sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
sharad pawar | uddhav thackeray | Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत सध्या दावे-प्रतीदावे होताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीसह महायुतीतील घटक पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर 'कॉन्फिडन्स'मध्ये असलेले महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) तीनही पक्ष आपल्याला जास्त जागा मिळण्यासाठी आग्रही असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहेत.

सध्या जागा वाटपाबाबतची अधिकृत चर्चा जरी सुरू झाली नाही. तरी प्राथमिक चर्चा मात्र झाल्या आहेत. त्यानुसार काही बेसिक फॉर्म्युले समोर आले आहेत. यामध्ये पुण्याचा फॉर्म्युला देखील वरिष्ठ पातळीवरती ठरला असल्याचं बोललं जात आहे.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
Chhagan Bhujbal : ठाकरेंच्या संपर्कात! पण येवल्यातच भुजबळांसाठी कुणी केली शिवसेनेची दारं बंद?

पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडीला गमवावी लागली आहे. पण, विधानसभेला पुण्यात महाविकास आघाडीला आपण चांगलं यश मिळवू, असा विश्वास आहे. त्यानुसारच महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी पुण्यातील जास्तीत जास्त आपल्याकडे घ्या, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेना ( ठाकरे गट ) पुण्यातील सहा विधानसभेच्या जागांसाठी आग्रही आहे. पुण्यातील जागा वाटपाबाबत काँग्रेसने अद्याप मौन स्वीकारले आहे.

दरम्यान, आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पुण्यात आपल्या पक्षाला सहा जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आली. वरिष्ठ पातळीवर पुण्याचा जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यानुसार काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी 3 तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 2 जागा मिळणार आल्याचे बोलले जात आहे.

sharad pawar | uddhav thackeray | Nana  Patole
Sharad Pawar : शरद पवारांनी आघाडीचं टेन्शन वाढवलं; '...म्हणून लोकसभेला दोन पावलं मागं सरलो'

प्राथमिक चर्चेनुसार शहरातील कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर या तीनही जागा काँग्रेसकडे असतील. खडकवासला, पर्वती आणि हडपसर या जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार निवडणूक लढतील. तर, कोथरूड आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला दिले जाण्याची शक्यता आहे.

स्थानिक पातळीवर जागांचा वाद असला तरी तीनही पक्षाच्या नेत्यांकडून ज्या जागा निश्चित आहेत. तिथे काम सुरू करण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com