Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरात 'गृहकलह'?

Deshmukh Vs Deshmukh : काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पुत्र सलील देशमुख निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांची भेट घेत केली मागणी.
Salil Deshmukh
Salil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्याचे माजी गृहमंत्री, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि काटोल नरखेड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अनिल देशमुख यांच्या मतदार संघावर आता त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी दावा केला आहे.

येणारी विधानसभा निवडणूक या मतदारसंघातून लढण्याची तयारी सलील यांनी केली आहे. तसेच याच मतदारसंघातून अनिल देशमुख हे देखील पुन्हा इच्छूक असल्याने माजी गृहमंत्र्यांच्या घरातच 'गृहकलह' निर्माण होण्याची शक्यता आहे.

काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघातून सध्या अनिल देशमुख आमदार म्हणून निवडून आले आहेत. गेल्या वर्षी जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर राहणे पसंत केले आहे. शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्यांना महत्वाचे स्थान आहे.

गृहमंत्री असताना त्यांच्यावर आरोप करत भाजप (BJP) सरकारने सत्तेत आल्यानंतर त्यांना तुरूंगात पाठविले होते. सचिन वाझे प्रकरणात त्यांचे नाव गोवण्यात आले होते. काही वर्षे त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून महत्वाच्या नेत्यांना बरोबर घेत भाजपला अजित पवार यांनी जाहिर पाठींबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख यांनी शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला.

Salil Deshmukh
Chandrasekhar Bawankule News : '.. म्हणून पोटनिवडणुका पुढे ढकला' ; बावनकुळेंची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी!

माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र सलील देशमुख हे विधानसभेसाठी इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वी सलील देशमुख यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व निर्णय शरद पवार घेत असतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अनिल की सलील या पैकी कोणत्या तरी एका देशमुखांना होकार द्यावा लागणार असल्याने ते सुद्धा पेचात पडले आहेत.

सलील देशमुख अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. सध्या ते नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षसुद्धा ते होते. काटोल नरखेड विधानसभा मतदार संघातून ते लढण्याच्या तयारीला लागले आहेत.मागील विधानसभेच्या वेळी सुद्धा ते तयार होते. मात्र अनिल देशमुख यांच्यामुळे त्यांना शांत बसावे लागले होते.अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी केलेल्या आरोपामुळे त्यांना तब्बल एक वर्ष इडीने तुरुंगात ठेवले होते.

Salil Deshmukh
Bacchu Kadu : शरद पवार सरदार तर अजित पवार कोण? बच्चू कडूंचा थेट अमित शहांना सवाल

या काळात सलील देशमुख यांनीच मतदार संघाचा संपूर्ण कारभार बघितला होता. मतदारसंघातील रखडलेल्या योजना व कामांचा पाठपुरावा करत त्यांनी अनेक कामे पूर्ण करण्यासाठी विशेष केले होते.दोन दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनीसुद्धा पक्षातील सर्वांनाच तिकीट मागण्याचा अधिकार आहे असे सांगितले होते. यामध्ये त्यांनी आपले पुत्र सलील देशमुख यांचेही नाव घेतले होते. पिता-पुत्राला आमदारकीचे तिकीट पाहिजे असल्याने आता तिकीट कोणाला मिळणार आणि नाराज कोण होणार, याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com