
NCP Office Bearers Meeting : राज्यात आपण सत्तेवर आहोत. विदर्भातून सहा आमदार निवडून आले आहे. यानंतरही पक्ष वाढत नाही याला जबाबदार कोण, अशी विचारणा करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले.
ते म्हणाले, "फक्त टाईट कपडे घालून फिरता, असे चालणार नाही. कोणी किती क्रियाशील सदस्यांची नोंदणी केली, याची आकडेवारी आपल्याकडे आहे. तुम्हाला जिल्ह्यात 10 लोकं सापडत नसतील आणि पक्षाचे बेसिक कामही करात नसेल, तर पक्ष कसा वाढणार? तुमच्या निष्ठेवर कसा विश्वास ठेवायचा", अशी विचारणा त्यांनी केली.
महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर (Nagpur) आणि अमरावती विभागातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी पटेलांनी सर्वांना जाहीरपणे सुनावले.
10 क्रियाशील सदस्य करण्यासाठी एक पुस्तिक भरून घ्यायची आहे. त्यासाठी फक्त 110 रुपयांचा खर्च येतो. एवढे पैसे दररोज चहापानात खर्च होतात. तेही खर्च करण्याची तसदी घेतली जात नाही. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात हीच स्थिती आहे. एवढे साधे काम पदाधिकारी करू शकत नसेल, तर तुमची पक्षावरची निष्ठा किती आहे, हे दिसते, असेही परखडपणे पटेल यांनी फटकारले.
नुसते मेळावे घेऊन आणि नेत्यांच्या भाषणाने पक्ष चालणार नाही. पक्षाचे काम खालपर्यंत गेले पाहिजे. विदर्भ हा ऐकेकाळी काँग्रेसचा (Congress) गड होता. आता राज्यात त्यांचे फक्त 16 आमदार शिल्लक राहिले आहे. काँग्रेसपासून दुरावलेला मतदार आपल्याकडे वळू शकतो. त्याकरिता आपणच पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकांना भेटा. राज्यात आपली सत्ता आहे. त्यांची कामे करा. संपर्क वाढवा अशा सूचना पटेल यांनी यावेळी दिल्या.
पक्ष मजबूत झाल्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे. मात्र त्यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. आपल्याला किती जागा हव्या आहेत त्या आपण मागूच. मात्र त्यासाठी आधी आपली ताकद वाढवावी लागले. आपण महायुतीत आहोत. जागा मागताना आपल्याकडे ठोस मुद्दे आणि आधार असणे आवश्यक आहे, याकडे देखील पटेल यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भात हक्काच्या जागा मागू शकतो. त्याची काळजी तुम्हाला करण्यात गज नाही. त्यासाठी मी आहे. माझा इंटरेस्ट फक्त पक्ष वाढीत आहे. मला राज्यात मंत्री व्हायचे नाही किंवा कुठले पदही घ्यायचे नाही. माझ्याकडे सर्व काही आहे असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.