Yashomati Thakur News : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भारतामध्ये युद्ध झाले. या शस्त्रसंधीनंतर हे युद्ध थांबले आहे. त्याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले आहे.भाजपकडून ऑपरेश सिंदूर तसेच पाकिस्तानच्या विजयाचे प्रतिक म्हणून तिरंगा यात्रा काढत आहेत. त्यावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी 'काँग्रेस नेतृत्वाने या देशासाठी रक्त वाहिले आहे, प्रसंगी प्राणांचे बलिदान देखील दिले आहे. पण ज्यांनी कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, ते आज तिरंगा यात्रा काढत आहेत.', अशी घणाघाती टीका केली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवांनांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.
पहलगाम हल्यानंतर ज्या प्रमाणे सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली तशी बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात युद्धबंदी करताना का घेतली नाही ? दहशतवादी पहलगाममध्ये आलेच तरी कसे ? हल्ल्यानंतर हे दहशतवादी कुठे पळून गेलेत ? असे प्रश्न ठाकूर यांनी विचारले.
दहशत वाद्यांना पकडण्याची जबाबदारी कोणाची होती. यांनी कधी स्व:तच्या संस्थांवर तिरंगा फडवला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे लोक आता तिरंगा यात्रा काढत सुटले आहेत, अशी टीका देखील ठाकूर यांनी भाजपवर केली. तसेच कर्जमाफी करून सातबारे कोरे करणार असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र काहीच केले नाही,या सरकारला शेतकऱ्यांचे काहीच देणे घेणे नाही. सरकार फक्त निवडणुकीत रमले आहे, असा हल्लाबोल देखील ठाकूर यांनी केला.
ट्रॅक्टर मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील सहभागी झाले होते. ते म्हणाले, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या आपरेशन सिंदूरचे आम्ही स्वागत करतो. भारतीय सैन्याने दाखविलेल्या शौर्याचे आम्ही कौतुक करतो. मात्र युद्धबंदी करण्याचा निर्णय सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कसे काय करू शकतात, पंतप्रधान नरेंद्र याचे कारण देशाला का सांगत नाहीत, लपवा छपवी का करित आहेत ?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.