Nitin Deshmukh News : ऐन विधानसभेच्या तोंडावरच 'लाचलुचपत'ने ठाकरेंच्या आमदाराची फाईल पुन्हा ओपन केली; चौकशीचा फास आवळणार

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : अमरावती एसीबीने यापूर्वी बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी मागच्या वर्षी आमदार नितीन देशमुख यांची चौकशी केली होती.त्यानंतर गेल्या वर्षभरात परत चौकशी झालेली नव्हती. आता एसीबीने देशमुख यांच्या कुटुंबियांचीही...
Nitin Deshmukh
Nitin DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Akola News : शिवसेनेतील बंडखोरीत गुवाहाटीवरुन परत फिरलेले आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिलेले आमदार नितीन देशमुख यांच्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांची फाईल पुन्हा एकदा ओपन केल्यामुळे देशमुखांच्या चौकशीचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आक्रमक नेते आणि महायुती सरकारवर कशाचीही तमा न बाळगता तुटून पडणारे नेते म्हणून आमदार नितीन देशमुखांची (Nitin Deshmukh) ओळख आहे.पण निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतानाच आता त्यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावला गेल्यामुळे अकोल्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची पुन्हा एकदा अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे.आता एसीबी (ACB) देशमुख दहा वर्ष अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते.याकाळात गैरप्रकार झाला आहे का याचा छडा लावणार आहे.

यापूर्वी'अमरावती एसीबी'ने बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी मागच्या वर्षी आमदार नितीन देशमुख यांची चौकशी केली होती.त्यानंतर गेल्या वर्षभरात परत चौकशी झालेली नव्हती.आता एसीबीने देशमुख यांच्या कुटुंबियांचीही वैयक्तिक माहिती गोळा करण्यास सुरूवात झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Nitin Deshmukh
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी अजितदादा अन् फडणवीसांच्या चर्चेतला 'तो' तपशील सांगितला; "मी विधानसभेत नको म्हणून.."

लाचलुचपत विभागाने आमदार नितीन देशमुखांच्या मुलगा-मुलगी शिकत असलेल्या शाळेकडे माहिती मागितली आहे.आमदार देशमुख मुलांची किती फी भरतात? यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांकडे चौकशी करण्यात आल्यामुळे आमदार नितीन देशमुखांनी आगपाखड केली आहे.

अमरावती एसीबीच्या चौकशीवर आता आमदार नितीन देशमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,गद्दारांबरोबर मी गेलो नसल्याने माझ्या पाठीमागे चौकशी लावण्यात आली आहे.पण आता माझी चौकशी ही एखाद्या बंद रूममध्ये नाही,तर सर्वांसमोर खुल्या पद्धतीने व्हावी अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे. मी वेळोवेळी चौकशीत सर्व माहिती दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Nitin Deshmukh
Manoj Jarange Patil And AAP: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'आप'ची 'एन्ट्री'; पहिला डाव अंतरवाली सराटीतूनच टाकणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com