

Vasai News : वसई पश्चिम भागात माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंडीत दिनदयाळ नगर परिसरात दिवसाढवळ्या चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद पाटील हे रस्त्यावरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात तिघांनी त्यांना जलाराममंदिराच्या समोर अडवले. त्यापैकी एका आरोपीने त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला चाकू खुपसून त्यांना जखमी केले. त्यानंतर तिघांनीही घटनास्थळावरून पळ काढला.
विशेष म्हणजे, आरोपींच्या मोटारसायकलला नंबर प्लेटचं नव्हती. तर घटनास्थळाहुन आरोपी पळून जाताना आरोपींनी चाकू आणि त्याचे कव्हर घटनास्थळीच टाकून दिले. तसेच काही अंतरावर आरोपींची मोटारसायकलही आढळून आली आहे.
ं
जखमी आनंद पाटील यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.आनंद पाटील हे माजी आमदार विवेक पंडित यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात आहेत.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतत्या घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपींच्या शोधासाठी विविध चार पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव कदम यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.