Sudhir Mungantiwar and Nitin Gadkari
Sudhir Mungantiwar and Nitin GadkariSarkarnama

Nitin Gadkari : नितीन गडकरींचं काम खूप मोठं, त्यांना कुणीच छोटं करू शकत नाही..!

Sudhir Mungantiwar : नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेलं काम खूप मोठं आहे. ते कुणाच्या आधारावर मोठे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना कुणीच छोटं करू शकत नाही.
Published on

Nitin Gadkari : भाजपने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतेच भाजपने आपल्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत पक्षातील अनेक मातब्बर नेत्यांची उमेदवारी कापण्यात आली. पहिल्या यादीत अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. या मुद्द्यावरून सध्या भाजपला धारेवर धरले जात आहे.

नितीन गडकरींना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत लोकांमध्ये उत्कंठा वाढली आहे. आता या मुद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आज (ता. 6) नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी गडकरींची बाजू भक्कमपणे मांडली. नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेलं काम खूप मोठं आहे. ते कुणाच्या आधारावर मोठे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना कुणीच छोटं करू शकत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

देशात कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. यासाठी आता प्रमुख पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. भाजपने या वेळी चारसौ पार चा नारा दिला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत याबाबतची गॅरंटी दिला आहे. यामुळे आता देशभरातील एक-एक जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रभावी नियोजन सुरू केले आहे. तयारी म्हणून पक्षाने नुकतीच आपल्या 195 उमेदवारांची घोषणा केली. या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नव्हता. दुसऱ्या यादीत महाराष्ट्राचा समावेश होईल, असे सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sudhir Mungantiwar and Nitin Gadkari
Sudhir Mungantiwar : वनमंत्री पुन्हा ठरले विक्रमवीर; जागतिक पातळीवर आणखी एका ‘रेकॉर्ड’ची नोंद

पहिल्या यादीत विद्यमान 28 मंत्रांचा समावेश करण्यात आला. पण अतिशय वरिष्ठ व अनुभवी असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात एकच चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षांनी मुद्दा उचलत रान पेटवले आहे. अशात आज भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर भाष्य केलं.

पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्राची यादी अजून जाहीर व्हायची आहे. नितीन गडकरी हे खूप मोठे नेते आहेत. देशात त्यांनी आपल्या कामाने याची पावती दिली आहे. त्यांची ख्याती एवढी आहे की, जगात त्यांना कुणीच छोटं करू शकत नाही, असे सांगताना मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी हे काय कुणाच्या आधारावर मोठे झाले आहेत का, असा प्रश्‍न केला. एकीकडे नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने विरोधी पक्षाने हा राजकीय मुद्दा बनविला आहे. त्याला आज सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार उत्तर दिले.

Edited By : Atul Mehere

R

Sudhir Mungantiwar and Nitin Gadkari
Sudhir Mungantiwar : वाघ नखानंतर मुनगंटीवार यांचा 'दांडपट्ट्यां'नी वार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com