मला कुणीही डावलले नाही, तर एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव मीच वरिष्ठांकडे दिला होता !

पदाची लालसा आम्हाला नव्हती. उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा हा निर्णय आधीच घेतला होता, असे फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvissarkarnama

नागपूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड यशस्वी झाल्यानंतर भाजप सत्तेत येणार, हे स्पष्ट झाले होते. तेव्हाच मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील, हेसुद्धा ठरलेलेच होते. पण ऐन वेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला भाग पाडण्यात आले. त्यामुळे फडणवीस व त्यांचे समर्थक दुखावले, त्यामुळे फलकांवर अमित शहांचा फोटो नाही लावला, अशा चर्चांना पेव फुटले. आज स्वतः फडणवीसांनी या चर्चांना विराम दिला.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच शहरात आल्यानंतर फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकारांसोबत वार्तालाप केला. यावेळी त्यांनी आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नव्हतो, हेही तितकेच खरे होते, असेही स्पष्ट केले. शिवसेनेच्या नेत्यांनी बंड नव्हे तर उठाव केला. त्याला आम्ही साथ दिली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ही अनैसर्गिक आघाडी होती. सर्वच शिवसेना (Shivsena) त्यामुळे दुखावले होते. पुढील निवडणुकीत जनतेसमोर कसे जायचे, असा प्रश्न त्यांना सतावत होता. सत्तेत असताना सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच घेत होती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार अस्वस्थ होते. भाजपने ठरवले असते तर मुख्यमंत्रिपद आम्हाला मिळाले असते. पण पदाची लालसा आम्हाला नव्हती. उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा हा निर्णय आधीच घेतला होता, असे फडणवीस यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेच कसे, असा प्रश्न अनेकांना आजही छळत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना अद्याप ते पचनी पडलेले नाही. फडणवीस यांचे डिमोशन करण्यात आले, अशी भावना त्यांच्या मनात आहे. मात्र याचा खुलासा स्वतः फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केला. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मी स्वतः पक्षश्रेष्ठींकडे नेला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कुणावरही अन्याय नाही..

महाविकास आघाडी सरकारने विदर्भ, मराठवाड्यासह इतर मागास भागावर अन्याय करणे सुरू केले होते. आता आमचे सरकार आहे. कुठल्याही विभागावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. महाराष्ट्राचा पुन्हा एकदा सर्वाधिक प्रगतिशील राज्य केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीस शब्द पाळणार?: दौंडचा मंत्रिपदाचा ७५ वर्षांचा वनवास संपणार?

रिक्षेवाल्याचा अभिमानच..

काँग्रेसचे नेते मोदी यांना चहावाला म्हणून हिणवत होते. त्यांनीच काँग्रेसला पाणी पाजले आहे. आज त्यांची काय अवस्था आहे, हे दिसतच आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना कुणी रिक्षावाले म्हणून हिणवत असेल तर आम्हाला त्याचा अभिमानच आहे. आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले नाही, असे सांगून फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

आमची चिंता करू नका..

उद्धव ठाकरे यांनी आमची चिंता करण्याची गरज नाही. आम्ही घेणारे नव्हे तर देणारे आहोत. त्यामुळे आमचे सरकार पूर्ण अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. पारिवारिक वारसा भलेही उद्धव ठाकरे यांच्याकडे भलेही असेल. मात्र बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

ओबीसींवर अन्याय होणार नाही..

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर अहवाल प्राप्त करून तो सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने बैठकसुद्धा झाली. हा अहवाल वेळेत न्यायालयात सादर करण्याला प्राधान्य आहे. ओबीसी समाजाला त्यांचा हक्क लवकरात लवकर प्राप्त करून दिला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com