Eknath Khadse News : खडसेंचं मोठं विधान, मी यापुढे कोणतीही निवडणूक...

Eknath Khadse On Bjp Govt : "केंद्राच्या तुलनेत राज्य सरकारच्या कामगिरीबीबात जनतेत आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे," असंही खडसेंनी सांगितलं.
Eknath Khadse
Eknath Khadsesarkarnama

Jalgaon News, 12 May : राष्ट्रवादी काँग्रेसमधून ( शरदचंद्र पवार ) पुन्हा स्वगृही अर्थात भाजपमध्ये ( Bjp ) जाणारे, आमदार एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश रखडला आहे. यातच एकनाथ खडसे यांनी मोठी घोषणा केली आहे. मी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही. माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच, मी राजकारणातून निवृत्ती घेतली नाही, असंही खडसे यांनी स्पष्ट केलं. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) म्हणाले, "मी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही. माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. कारण, अजून पाच वर्षे मी विधानसभेचा आमदार आहे. शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी सांगितलं की, दिलेली वस्तू परत घेत नाही. त्यामुळे शरद पवार यांनी अभय दिल्यामुळे दुसऱ्या कोणी आमदारकीचा राजीनामा मागितला, तर याच्याशी काही देणं-घेणं नाही. मी राजकारणातून निवृत्त घेतलेली नाही. पण, सध्या निवडणूक लढण्याकडे माझा कल नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"रावेरची निवडणूक जाहीर झाल्यापासून मी भाजपत प्रवेश करण्याचं सूचित केलं होतं. भाजपत प्रवेश आणि रक्षा खडसे या माझ्या सून असल्यानं, दोन्ही भूमिकेतून मी प्रचार करत आहे. निवडणूक भाजप लढवित आहे. मी जोडीला मदत करत आहे. खान्देशात पूर्वीसारखं वातावरण राहिलेलं नाही. पण, एवढी वाईट परिस्थिती सुद्धा नाही. मोदी पंतप्रधान व्हावे, असं जनतेला वाटतं. केंद्राच्या तुलनेत राज्य सरकारच्या कामगिरीबीबात जनतेत आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे," असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

Eknath Khadse
Eknath Khadse News : पक्ष सोडल्यानंतरही एकनाथ खडसेंची आमदारकी कायम राहणार; काय आहे शरद पवारांची 'गॅरंटी'?

"माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, हे विनोद तावडे ( Vinod Tawde ) यांनी सांगितलं आहे. त्यामुळे निश्चिंत आहे. माझ्या भाजप प्रवेशाला गिरीश महाजान, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नाही. मुळात विरोध नव्हताच. त्यांचे नाराजीचे सूर होते. आता ती नाराजी दूर झाली आहे," असंही खडसे यांनी सांगितलं.

Eknath Khadse
Eknath Khadse : एकनाथ खडसेंची राज्यपालपदी नेमणूक नको; अंजली दमानियांनी सांगितलं कारण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com