Political News: इच्छुक उमेदवार म्हणतात निवडणुकीसाठी 'तयार है हम' ! मात्र भाऊ तिकीटाची नाही शाश्वती...

Maratahi News : इच्छुकांनी सुरू केल्या भेटीगाठी
sunil mendhe, ashok nete
sunil mendhe, ashok nete Sarkarnama
Published on
Updated on

GONDIA NEWS : गोंदिया जिल्ह्यात दोन लोकसभा, चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या चारही ठिकाणी प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी आगामी निवडणूक लढविण्याच्या निर्धार करीत इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच प्रतिनिधीत्व करणाऱ्यांनी पक्ष आपल्यालाच संधी देणार, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण करून भेटीगाठी, कार्यक्रमाचे उद्घाटनात आवर्जून उपस्थिती आणि प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू केले आहे. असे असले तरी अनेक उमेदवारांना तिकीटाची शाश्वती तेवढ्या विश्वासाने दिसून येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत इच्छुक उमेदवार आपल्या मतदारसंघात वावरू लागला आहे.

लोकसभा, विधानसभेचा पंचवार्षिक कार्यकाळ या वर्षात संपुष्टात येत आहे. लोकसभा निवडणूका मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकाही लागणार, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने राजकीय पक्ष व पक्षातील पुढारी ॲक्शन मोडवर आले असून पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

sunil mendhe, ashok nete
Bjp News : श्रीरामाच्या पोस्टरबाजीतून भाजप नेत्यांकडून प्रचाराचा धडाका, पक्षश्रेष्ठींचे आदेश धुडकावले!

गोंदिया जिल्ह्यात दोन लोकसभा व चार विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघात प्रतिनिधीत्व करणारे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. भेटीगाठी व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आगामी निवडणुकीसाठी 'तयार है हम' असा संदेश देत आहेत. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या रिंगणात पक्ष आपल्यावरच विश्वास दर्शवून उतरविणार, असेही आपल्या सक्रियेतून संधी समर्थक कार्यकर्त्यांसह जनतेला दाखविले जात आहै.

प्रतिनिधीत्व करणाऱ्यांचे प्रतिस्पर्धीही मैदानात

सर्वच राजकीय पक्षामध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुक लढविण्यास इच्छूक आहेत. मागील निवडणुकीतही एका पेक्षा अधिक निवडणूक लढविणाऱ्यांना आगामी निवडणूक तुमचीच, असे आश्वासन देत पक्षाकडून आदेशाचे पालन करण्याचे सुचना केल्या होत्या. त्यानुरूप या निवडणुकीत पक्ष आपल्याच उमेदवारी देईल, या अनुषंगाने काही इच्छूक प्रतिनिधीत्व करणाऱ्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान आपला मतदारसंघ पिंजून काढण्यास इच्छुक उमेदवार जीवाचे रान करताना दिसून येऊन राहिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विद्यमान खासदारांचे भवितव्य

गोंदिया जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघात मोडतो आहे. भंडारा-गोंदिया मतदार संघाचे प्रतिनिधीत्व भाजपचे सुनील मेंढे करीत आहेत. आगामी निवडणुकीसाठी त्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सलग दुसऱ्यांदा अशोक नेते करीत आहेत. तिसऱ्यांदाही निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी सुध्दा तयारी सुरू केली आहे. मात्र दोन्ही विद्यमान खासदारांना महायुती पुन्हा संधी देणार की नाही ? अशी चर्चा सुरू झाली आहे.तरी त्यांची तयारी फक्त आपल्याला तिकीट मिळणार या विश्वासाने दोन्ही खासदार काम करत असताना दिसत आहे. शेवटी वेळेवर पक्ष क़ाय ठरविते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

(Edited by : Sachin Waghmare)

sunil mendhe, ashok nete
Sunil Mendhe News: स्वतःचे पगार थांबवा, पण शेतकऱ्यांना त्यांचे पैसे द्या; खासदार सुनील मेंढेंची अधिकाऱ्यांना तंबी

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com