Vijay Wadettiwar, Chhagan Bhujbal
Vijay Wadettiwar, Chhagan BhujbalSarkarnama

OBC Politics : ओबीसी नेत्यांमध्ये एकजूट नाही? काँग्रेसच्या मोर्चाआधीच भुजबळांकडून मेळाव्याचे आयोजन

OBC Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसीचे नेते आक्रमक झाले आहेत. हैदराबाद गॅझेटवरून सर्वांचा रोष आहे. या विरोधात कोर्टात जाण्याचे इशारे महाविकास आघाडीच्यावतीने दिले जात आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे.
Published on

Nagpur News, 17 Sep : मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसीचे नेते आक्रमक झाले आहेत. हैदराबाद गॅझेटवरून सर्वांचा रोष आहे. या विरोधात कोर्टात जाण्याचे इशारे महाविकास आघाडीच्यावतीने दिले जात आहे.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली आहे. मात्र त्यापूर्वीच ओबीसीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या शहरात मेळावा आयोजित केला आहे. हे बघता ओबीस आरक्षणावरून ओबीसी नेत्यांमध्येही एकजूट नसल्याचे समोर आले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा-कुणबी नोंद आढळल्यास कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील असे जाहीर केले आहे. त्याचा जीआरसुद्धा काढला आहे. या जीआरमधून पात्र शब्द वगळण्याला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे.

हा शब्द वगळून मराठा समाजाला सरसकट ओबीसीत येण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला आरोप ओबीसी नेत्यांचा आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मात्र या जीआरमुळे ओबीसीचे नुकसान होणार नसल्याचे जाहीर केले.

Vijay Wadettiwar, Chhagan Bhujbal
Sharad Pawar-Kalmadi News : कलमाडी रुग्णालयात, शरद पवार भेटीला; 1991 मध्ये पंतप्रधानपदासाठी लावली होती ‘फिल्डींग’, काय घडलं होतं?

मात्र, वडेट्टीवारांनी तायवाडे यांची भूमिका आता पूर्वीसारखी राहिली नाही असे सांगून त्यांच्यावर भाजपकडे झुकल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळात असतानाही भुजबळही आपल्याच सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी जाहीरपणे जीआरला विरोध केला आहे.

त्यांच्या भूमिकेशी वडेट्टीवार यांनी सहमती दर्शवली होती. मात्र आता आंदोलन कोणाच्या नेतृत्वात करायचे यावरून वाद निर्माण झाल्याचे या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने दिसून येते. नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या आदल्या दिवशी 18 सप्टेंबरला रेशीमबागेतील महात्मा ज्योतीबा फुले सभागृहात ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Vijay Wadettiwar, Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis : तेरा कोटी खर्चून बांधलेल्या 'रायगड' व्हिआयपी सूटला देवेंद्र फडणवीसांचे पायही लागले नाही!

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्यावतीने हा मोर्चा काढला जाणार असला तरी अद्याप काँग्रेसच्या कुठले वरिष्ठ नेते यात सहभागी होणार आहेत याची माहिती कोणालाच नाही. एकूणच वडेट्टीवार यांच्या पूर्वी ओबीसीचा मेळावा घेऊन भुजबळ यांचा मैदान मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com