Sharad Pawar-Kalmadi News : कलमाडी रुग्णालयात, शरद पवार भेटीला; 1991 मध्ये पंतप्रधानपदासाठी लावली होती ‘फिल्डींग’, काय घडलं होतं?

Suresh Kalmadi Under Treatment at Dinanath Mangeshkar Hospital : माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची शरद पवार यांनी काल रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
Sharad Pawar visiting former Union Minister Suresh Kalmadi at Dinanath Mangeshkar Hospital in Pune.
Sharad Pawar visiting former Union Minister Suresh Kalmadi at Dinanath Mangeshkar Hospital in Pune.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. यंदा त्यांनी सुरू केलेल्या पुणे फेस्टिव्हललाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. काल पुणे दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन कलमाडी यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीआधी पवारांनी थेट दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गाठले. यावेळी डॉ. धनंजय केळकर यांनी कलमाडी यांच्या प्रकृतीबाबत पवारांना सविस्तर माहिती दिली. यावेळी मीरा कलमाडी, सुमिर कलमाडी, विठ्ठल मणियार, अंकुश काकडे उपस्थित होते.

पवार-कलमाडी मैत्री

शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांची मैत्री राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. वरिष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांच्या ‘24 अकबर रोड’ या पुस्तकात या मैत्रीचा उल्लेख आहे. 1991 मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदासाठी चुरस होती. नरसिंह राव, शरद पवार, अर्जुन सिंग आणि डॉ. शंकरदयाल शर्मा यांची नावे चर्चेत होती.

Sharad Pawar visiting former Union Minister Suresh Kalmadi at Dinanath Mangeshkar Hospital in Pune.
Local Body Elections : भाजपचा स्वबळाचा नारा फोल, महायुतीचं ठरलं! पहिली बातमी पश्चिम महाराष्ट्रातून...

कलमाडींनी पवारांना पंतप्रधान करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली होती. त्यावेळी सुरेश कलमाडी यांना एके काळी दिल्ली दरबारी 'लॅव्हीश' फाइव्ह स्टारमध्ये पार्ट्या आयोजित करणारे तरबेज नेते मानले जायचे. याचाच फायदा करून घेत कलमाडींनी दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये नवनिर्वाचित काँग्रेस खासदारांसाठी भव्य डिनरचे आयोजन केले होते.

Sharad Pawar visiting former Union Minister Suresh Kalmadi at Dinanath Mangeshkar Hospital in Pune.
Nupur Bora Case : सरकारी नोकरीत केवळ 5 वर्षे, महिला अधिकाऱ्याच्या घरात सापडली 2 कोटींची रोकड व दागिने; मुख्यमंत्रीही चक्रावले

डिनरला 64 खासदारांनी हजेरी लावली होती. या घटनेने काँग्रेससह अनेक नेत्यांना धक्का बसला होता. अखेरीस नाट्यमय घडामोडींमुळे पवारांना पंतप्रधानपद मिळाले नाही, पण मित्रासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या कलमाडींची चर्चा जोरदार झाली होती. यांसह दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. काल कलमाडी यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार रुग्णालयात गेल्यानंतर पुन्हा एकदा दोघांमधील मैत्रीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com