Omprakash Yadav : नागपूर पदवीधरच्या पराभवाला 'ते' नेतेच जबाबदार, CM फडणवीसांच्या मतदारसंघात कमी नोंदणी, ओमप्रकाश यादवांचा खळबजनक दावा

Nagpur Graduates Constituency Defeat : निवडणुकीसाठी मतदार नोंदणी आणि इतर जबाबदाऱ्या सोपवलेल्या नेत्यांनी आपले काम योग्यरीत्या केले का, याची पक्षाने चौकशी करावी, अशी मागणी ओमप्रकाश यादव यांनी केली आहे.
Omprakash Yadav
Omprakash Yadav sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur News : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांमधील नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची मोठी संधी असतानाही अत्यंत कमी नोंदणी झाल्याचा आरोप भाजप नेते ओमप्रकाश यादव यांनी केला आहे.

मतदार नोंदणी कमी होण्यामागे पक्षातीलच काही नेते जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर केवळ '२' हा आकडा लिहिल्यामुळे मोठ्या संख्येने मते जाणीवपूर्वक अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप यादव यांनी केला आहे.

निवडणुकीसाठी मतदार नोंदणी आणि इतर जबाबदाऱ्या सोपवलेल्या नेत्यांनी आपले काम योग्यरीत्या केले का, याची पक्षाने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ते म्हणाले, पक्षाने आत्मपरीक्षण करावे. साऱ्या निवडणुकीत असमाधानी असतात ते नेते पक्ष नोंदणीवेळी कुठे गेले होते हे त्यांना विचारायला हवे.नोंदणी न होण्याचे कारण काय आहे, याचे विचारणा झाली पाहिजे.

Omprakash Yadav
Nagpur Election Results: ..अखेर भीती खरी ठरली; नागपूर पदवीधर भाजपनं गमावला; काँग्रेसनं खातं उघडलं; वंजारींनी बाजी पलटवली; कोहळेंना पराभवाचा धक्का

अभिजीत वंजारी विजयी

नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळेंचा पराभव केला. वंजारी यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली. तर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. 

Omprakash Yadav
Nagpur Graduates constituency : नागपूर पदवीधरमध्ये धक्कादायक प्रकार : मतदानासाठी जांभळ्याऐवजी काळ्या शाईचा वापर, आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मते ठरवली वैध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.