Amravati MLC : विधानपरिषद निवडणुकीत अमरावतीतून भाजपच्या प्रवीण पोटेंची हॅटट्रिक; काँग्रेस उमेदवाराला भोपळा

Pravin Pote, Amravati MLC Election, BJP Victory: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे ३९० मतांसह विजयी झाले. सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी हॅटट्रिक साधली, तर काँग्रेसला एकही मत मिळाले नाही.
Former minister Pravin Pote
Former minister Pravin PoteSarkarnama
Published on
Updated on

Amravati MLC election result 2026: विधानपरिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक साधली आहे. एकतर्फी ठरलेल्या या निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांचा ३५९ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही.

या निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा हे रिंगणात होते. मतदारसंघातील एकूण ४५१ मतदारांपैकी ४२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Former minister Pravin Pote
Amravati MLC election : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत फूट : शिवसेनेने बिघडवले भाजपचे गणित; काँग्रेसला विजयाची संधी

अमरावती येथील नियोजन भवनात सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतदान झालेल्या मतांपैकी ६ मते अवैध ठरल्याने वैध मतांची संख्या ४२१ झाली. त्यामुळे विजयासाठी २११ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

मतमोजणी दोन टेबलवर पार पडली. पहिल्या टेबलवर २०० तर दुसऱ्या टेबलवर २२७ मतांची गणना करण्यात आली. पहिल्याच फेरीत भाजपचे प्रवीण पोटे यांनी ३९० मते मिळवत विजयासाठी आवश्यक कोटा सहज पूर्ण केला.

अंतिम निकालात प्रवीण पोटे यांना ३९० मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना एकही मत मिळाले नाही.

Former minister Pravin Pote
MLC Election Results : विधानपरिषदेत भाजपचा जलवा; बसवराज पाटील राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी

जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रवीण पोटे यांना विजयी घोषित केले. या विजयासह प्रवीण पोटे यांनी अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होताच जल्लोष करत प्रवीण पोटे यांचे अभिनंदन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com