Amravati MLC election : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीत फूट : शिवसेनेने बिघडवले भाजपचे गणित; काँग्रेसला विजयाची संधी

Viplav Bajoria nomination, Pravin Pote BJP : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असा सामना होण्याचे चित्र अपेक्षित असताना आता ही निवडणूक तिहेरी वळणावर आली आहे.
Parbhani-Hingoli MLC Election 2026; Former MLA Viplav Bajoriya, Eknath Shinde And Devendra fadnavis
Parbhani-Hingoli MLC Election 2026; Former MLA Viplav Bajoriya, Eknath Shinde And Devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी अंतिम क्षणी नामांकन दाखल केल्याने महायुतीत फूट पडली आहे. बाजोरिया यांनी केलेल्या नामांकनामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाल्याचे मानले जात असून या निवडणुकीत तिहेरी लढतीचे चित्र सध्या आहे. काँग्रेससाठी राजकीय वातावरण अनुकूल मानल्या जात असले तरी नगरसेवकांच्या फुटीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी (ता. 1) अखेरच्या दिवशी महायुतीकडून भाजपचे प्रवीण पोटे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. नीलेश विश्वकर्मा, अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया व प्रशांत श्रीधर महल्ले यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसच्या हर्षजित देशमुख यांनी आधीच अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत आता चार प्रमुख उमेदवार रिंगणात आले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी असलेल्या अवधीत कोण माघार घेतो, याकडे लक्ष वेधले गेले आहे.

तथापि, तिहेरी लढत अपेक्षित असून बाजोरिया यांच्या उमेदवारीने महायुतीमधील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पोटे यांना महायुतीतील भाजपसह राष्ट्रवादी व शिवसेनेचे समर्थन असल्याचा दावा असून पालकमंत्र्यांनी युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा व भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची नाराजी दूर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या पक्षाचेही समर्थन राहणार असल्याचा दावा करीत विजय पोटे यांचाच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Parbhani-Hingoli MLC Election 2026; Former MLA Viplav Bajoriya, Eknath Shinde And Devendra fadnavis
CBSE OSM controversy : CBSE तील घोळाने मोदी सरकार हादरले; केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच केली पहिली कारवाई

निवडणूक तिहेरी वळणावर

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असा सामना होण्याचे चित्र अपेक्षित असताना आता ही निवडणूक तिहेरी वळणावर आली आहे. शिवसेनेने अमरावतीसाठी महायुतीकडे आग्रह धरला होता. मात्र, भाजपने प्रवीण पोटे यांना उमेदवारी जाहीर करून व नामांकन दाखल करून शिंदेंचा आग्रह अव्हेरल्याने माजी आमदार विप्लव बाजोरिया यांना रिंगणात आणल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांचा अर्ज दाखल करताना युवा स्वाभिमानचे काही पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. युवा स्वाभिमान पक्ष व अपक्ष, असे 70 नगरसेवक सोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काँग्रेसला संधी

काँग्रेसने स्थानिक पातळीवरील उमेदवार न देता यावेळी नागपूर येथील व्यावसायिक हर्षजित देशमुख यांना मैदानात आणले आहे. मूळचे अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेले हर्षजित देशमुख नवखे असले तरी काँग्रेसची दमदार फळी त्यांच्यासोबत आहे. मतदारसंख्या भाजपच्या तोडीस तोड असल्याने ही निवडणूक काँग्रेसने गांभीर्याने घेतल्यास विजयाची संधी असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला एमआयएम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची साथ मिळू शकते.

Parbhani-Hingoli MLC Election 2026; Former MLA Viplav Bajoriya, Eknath Shinde And Devendra fadnavis
BJP Politics : एकही निवडणूक न जिंकलेल्या नेत्यामुळे भाजपमध्ये भूकंप; पक्ष फुटण्याची भीती, खुद्द अमित शाह मैदानात?

हॅट्ट्रिक अडचणीत

माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी या मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवला आहे. नगरपरिषद व महापालिकेतील भाजपचे संख्याबळ मोठे आहे. याशिवाय मित्रपक्ष राष्ट्रवादी, शिवसेनेसह युवा स्वाभिमानचे सदस्य धरून एकहाती विजय मिळवण्याचा भाजपचा दावा होता. मात्र विप्लव बाजोरिया यांनी उमेदवारी दाखल केल्याने महायुतीत फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या नाराजीमुळेही प्रवीण पोटे यांना यावेळी हॅट्ट्रिक मारण्यात यश मिळेल का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com