ZP मध्ये अध्यक्षांनी रोखला माजी अध्यक्षांचा निधी, सुनील केदारांच्या भूमिकेकडे लक्ष !

ZP President : यापुढे माजी अध्यक्षांचे अनेक निर्णय बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur ZP News : जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची (Congress) सत्ता असून माजी मंत्री आमदार सुनील केदार गटाचे वर्चस्व आहे. नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होताच आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. विद्यमान अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांना माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या सर्कलमध्ये देण्यात आलेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेतला. त्यामुळे त्यांच्यातील शीतयुद्ध चव्हाट्यावर आले.

नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेमध्ये (ZP) सत्ताधारी गटातील धुसफुशीची ही सुरुवात असून, यापुढे माजी अध्यक्षांचे अनेक निर्णय बदलणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये आमदार सुनील केदार (Sunil Kedar) काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कांद्री ग्रामपंचायतीला शेष फंडातून ७५ लाख रुपये विकास कामांसाठी देण्याचे मंजूर करण्यात आले. यातील ३१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत संजय झाडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ३१ लाख रुपयांचा निधी वळता झाला. ४४ लाखांचा निधी देणे बाकी आहे. शेष फंडात पैसा नाही, उर्वरित रक्कम कुठून देणार, हा प्रश्न त्यांनी केला. पूर्ण नियोजन झाल्यानंतर या निधीचे बघू अन्यथा हा निधी देण्यात येणार नाही, असे अध्यक्ष कोकड्डे यांनी स्पष्ट केले.

संत्रा व इतर बागायती पिकांवर औषधी फवारणीसाठी १० लाखांची तरतूद करण्याचा निर्णय झाला. सध्या छदाम शेष फंडात नाही, अशावेळी हीच योजना राबविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. अध्यक्षांनी औषधीसाठी इतर शीर्षावरून हा निधी वळता करण्याचे आश्वस्त केले. जिल्हा नियोजन समितीचा निधीही येत्या काही दिवसांत येणार असल्याचे समजते. त्यातील निधीला कात्री लागणार असल्याचे बोलले जाते. दोन महिला अध्यक्षांनी हा निर्णय घेतला असला तरी यात ‘धन्याचे राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.

Sunil Kedar
Video: आमच्या लोकांना सांभाळण्यात उणिवा राहिल्या; सुनील केदार

ग्रामसेवक निलंबित..

हिंगणा तालुक्यातील दहेली ग्रामपंचायतीत कोलार ग्रामपंचायतीच्या कर पावत्या देण्यात आल्याने ग्रामसेवकांच्या निलंबनाचा ठराव घेण्यात आला. हा मुद्दा विरोधी पक्षनेते आतीश उमरे यांनी उपस्थित केला. धानला गावातील एका रस्त्यासाठी दोन वेगवेगळ्या विभागाचा निधी देण्याचा मुद्दा तापेश्वर वैद्य यांनी उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचे निर्देश अध्यक्षांनी दिले. रायपूर सर्कलचे सदस्य दिनेश बंग यांनी ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com