

नागपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) उद्या १४ डिसेंबरला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होत्या. तेथे ५ किलोमीटर अंतरावरून शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते ई-सायकलींचे (e-cycle) वाटप होणार होते. पण काही अपरिहार्य कारणास्तव त्यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे.
विजय-किरण फाऊंडेशनच्यावतीने गडचिरोली जिल्हा आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी इ-सायकलींचे वाटप प्रियांका गांधी यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम १४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. ही माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली शनिवारी दिली होती. प्रियांका पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यात येत असल्यामुळे संपूर्ण काँग्रेस तयारीला लागली होती. पण पण हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला आहे.
प्रियांका गांधी यांच्या या दौऱ्यात जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शाळकरी-महाविद्यालयीन मुलींना बॅटरीवरील सायकलींचे वितरण केले जाणार होते. शैक्षणिक प्रगतीत अडचण येऊ नये, यासाठी हा पुढाकार विजय-किरण फाऊंडेशनच्यावदीने घेण्यात आला होता. एकूण १० हजार ई-सायकलींचे वितरण यात केले जाणार होते. स्थानिक उद्योगांनी यासाठी सीएसआर फंड दिला आहे.
गडचिरोली हा आदिवासी, नक्षलग्रस्त आणि अत्यंत दुर्गम जिल्हा आहे. प्रियांका गांधी या जिल्ह्यात पहिल्यांदाच येणार होत्या. त्यामुळे सर्व जिल्हावासी त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होते. प्रति इंदिरा गांधी म्हणून त्यांच्याकडे देश आज आशेने बघतो आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी त्या सातत्याने काम करीत असतात. गडचिरोली जिल्ह्यातील महिला, मुलींशी या दौऱ्यात त्या संवाद साधणार होत्या. आठव्या वर्गात शाळेत जाणाऱ्या ते पदवीधरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना कुठल्याही सुविधा नव्हत्या. त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून हा कार्यक्रम आखला होता.
अशी आहे सायकल...
सीएसआर फंडातून विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायकली या बॅटरीवर ३ किलोमीटर अंतर कापू शकतील. त्यानंतर पायडल मारून एक किलोमीटर सायकल चालवल्यावर बॅटरी पुन्हा चार्ज होते. चालत्या सायकलीत बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर पुन्हा ३ किलोमीटर अंतर कापता येते. याशिवाय ही बॅटरी इलेक्ट्रिकवर सुद्धा चार्ज करता येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.