Pusad Bank News : राठोड, नाईक, गवळींच्या पुढाकाराने ‘पुसद अर्बन’ची निवडणूक तिसऱ्यांदा बिनविरोध !

Yavatmal : पुसद अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
Sharad Maind, Bhavana Gawali,Sanjay Ratod and Manohar Naik.
Sharad Maind, Bhavana Gawali,Sanjay Ratod and Manohar Naik. Sarkarnama

The election of the Board of Directors was uncontested : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. सहकारी बँक क्षेत्रातील ही उल्लेखनीय बाब आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, माजी मंत्री मनोहरराव नाईक आणि खासदार भावना गवळी यांनी पुढाकार घेतला. (MP Bhavna Gawli took the initiative)

बँकेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत चार जुलै या अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी संचालकांच्या एकूण १५ जागांसाठी तेवढेच अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे पाच जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उप निबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पुसद अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

नवनिर्वाचित संचालकांमध्ये २५ किलोमीटरच्या आत वैयक्तिक मतदार संघातून पुसदमधील विद्यमान अध्यक्ष शरद आप्पाराव मैंद, तसेच संचालक ललित हिम्मतलाल सेता, नीळकंठ गोविंदराव पाटील, बाळासाहेब जयवंतराव पाटील, के.आय.मिर्झा, प्रवीर प्रकाश व्यवहारे, विनायक गुरुनाथ डुबेवार निवडून आले.

२५ किलोमीटरच्या बाहेरील वैयक्तिक मतदार संघातून विद्यमान उपाध्यक्ष राकेश ओमप्रकाश खुराणा (वणी), अविनाश नंदकिशोर अग्रवाल (उमरखेड ), अतुल पांडुरंगराव पावडे (नांदेड ), महिला राखीव मतदार संघ राजश्री सुधीरराव देशमुख (दिग्रस), वंदना शरद पाटील (पुसद ), वि. जा. भ. ज. वि.मा.प्र.मतदार संघ सुनील दयाराम चव्हाण (पुसद ), ई. मा. प्र. निरंजन खुशालराव मानकर (यवतमाळ) अ. जा. अ. ज. मतदार संघ रंजित धर्मिदास सांबरे (पुसद ) यांचा समावेश आहे.

Sharad Maind, Bhavana Gawali,Sanjay Ratod and Manohar Naik.
Yavatmal - Washim Constituency: 'हा' नेता वाढवणार Bhavana Gawali यांची डोकेदुखी | Sarkarnama

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार संजय राठोड, (Sanjay Rathod) माजी मंत्री मनोहरराव नाईक , खासदार भावना गवळी, (Bhavana Gawali) आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार समीर कुणावार (हिंगणघाट) यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com