Rahul Bondre Politics: राहुल गांधींच्या एका फोननंतर बोंद्रेंचा भाजपप्रवेश रद्द; काही तासांतच आमदार श्वेता महालेंचा खळबळजनक दावा

Shweta Mahale Vs Rahul Bondre: राहुल बोंद्रे यांनी संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फोनवरुन संवाद साधल्यानंतर आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये राहुल बोंद्रे यांच्यासह चिखलीच्या राजकारणात घडलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडींवर भाजप आमदार श्वेता महाले यांनी भाष्य केलं आहे.
Rahul Bondre rahul gandhi shweta Mahale .jpg
Rahul Bondre rahul gandhi shweta Mahale .jpgSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News: काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधींनी आपल्या एका फोननं विदर्भातील चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश रोखला.या पक्षप्रवेशासाठी पड्द्यामागं ज्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्‍यांपर्यंत फिल्डिंग लावली होती. त्यात बोंद्रेंच्या कट्ट्रर राजकीय विरोधक राहिलेल्या चिखली मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह त्यांचे पती व देवेंद्र फडणवीसांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांचा समावेश होता. भाजपच्या प्रवेशाचा आपला राजकीय निर्णय फिरवल्यानंतर आता काँग्रेसच्या राहुल बोंद्रेंवर आमदार श्वेता महाले यांनी पहिली प्रतिक्रिया देतानाच खळबळजनक विधान केलं आहे.

राहुल बोंद्रे यांनी संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फोनवरुन संवाद साधल्यानंतर आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस नेते राहुल बोंद्रे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा अन् सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर आमदार श्वेता महाले यांनी केलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले म्हणाल्या, राहुल बोंद्रे यांच्या 2019 पासून भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. पक्षप्रवेशाच्या चर्चा घडवून आणणारेही तेच आहेत. भाजपने कधीच त्यांचा अधिकृतपणे प्रक्षप्रवेश असल्याचं जाहीर केलं नव्हतं, असंही महाले यांनी स्पष्ट केलं.

राहुल बोंद्रेंनी हे सांगावं की, त्यांना कधी ईडीची नोटीस आली ?असा प्रतिप्रश्न भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला. तसेच भाजप पक्षप्रवेशासंदर्भात त्यांनीच संदेश पाठवले होते.त्यात ते राजकीय संन्यास तर कधी राजकीय हस्तक्षेप न करण्याचा दावा करत होते. मात्र,त्यांच्यावरती अनेक आरोप झालेले आहेत. कोणत्या एका पक्षाचा आहे कारवाई थांबेल असं कधी होत नसतं, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली.

Rahul Bondre rahul gandhi shweta Mahale .jpg
Rahul Bondre News : राहुल गांधींनी मातब्बर नेत्यांनाही कधी थांबवलं नाही; मग 2 टर्म आमदार राहिलेल्या बोंद्रेंसाठी थेट फोन का? वाचा Inside Story

मात्र, राहुल बोंद्रेंना चर्चेत राहायचं आहे. ते मानसिकदृष्ट्या खचलेले असल्यानं त्यांना भाजप पक्षात न घेतलेलं बरं असा जोरदार हल्लाबोलही चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी म्हटलं आहे. तसेच ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करण्याच्याही प्रयत्नात होते. पण ते दोनवेळा पडले असून त्यांना घेऊन कोणता चमत्कार होणार होता असा खोचक टोलाही भाजप आमदार श्वेता महाले यांनी बोंद्रेंना लगावला.

काँग्रेसचे चिखली मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी 20 सप्टेंबरला फेसबुक लाईव्ह करत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनी 22 सप्टेंबर रोजी भाजपप्रवेश करणार असल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात होता.

Rahul Bondre rahul gandhi shweta Mahale .jpg
Chandrakant Patil: ‘टक्केवारी देता देता ठेकेदार मरून जातो’; चंद्रकांत पाटलांकडून बोलता बोलता लोकप्रतिनिधींच्या कमिशनखोरीची जाहीरपणे कबुली

चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांच्याच जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात होता. मात्र,काही तासांमध्येच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वेगानं सूत्रे फिरवली अन् राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांची फोनवरुन चर्चा घडवून आणत त्यांचा भाजपप्रवेश रोखला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com