Rahul Bondre News : राहुल गांधींनी मातब्बर नेत्यांनाही कधी थांबवलं नाही; मग 2 टर्म आमदार राहिलेल्या बोंद्रेंसाठी थेट फोन का? वाचा Inside Story

राहुल गांधी यांच्या फोननंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला. बोंद्रे यांनी फेसबुक पोस्टद्वारे काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
Rahul Bondre Stays with Congress After Rahul Gandhi Call
Rahul Bondre Stays with Congress After Rahul Gandhi CallSarkarnama
Published on
Updated on

Rahul Bondre News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करून समजूत काढल्यानंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा मंगळवारी होणारा नियोजित भाजपप्रवेश रद्द झाला आहे. स्वतः बोंद्रे यांनी आपण काँग्रेससोबतच थांबणार असल्याचे फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केले आहे. राहुल गांधींशी बोलताना राहुल बोंद्रे यांनी "मै सबकुछ न्योछावर कर दूंगा लेकिन आपके साथ लढाई लढूंगा....!" असंही म्हटलं.

राहुल गांधी यांच्या या फोननंतर बोंद्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असल्याचे चित्र आहे. रात्री उशीरा बोंद्रे यांच्या चिखलीतील राजा टॉवर परिसरातील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी “राहुलभाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या निमित्ताने राहुल गांधी यांनी यापूर्वी काँग्रेस सोडून गेलेल्या अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, राधाकृष्ण विखे पाटील अशा बड्या नेत्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले नव्हते. मग फक्त दोन टर्मचे आमदार असलेल्या राहुल बोंद्रे यांच्यासाठी थेट फोन का केला? नेमके पडद्यामागे काय घडले? असा प्रश्न विचारला जात आहे. तर याचे उत्तर आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि बुलढाणा जिल्हा.

मुकुल वासनिक हे बोंद्रेंसाठी नेतृत्व, तर हर्षवर्धन सपकाळ हे त्यांचे जवळचे मित्र. बुलढाण्यात सपकाळ यांचे जे काही मुठभर समर्थक आहेत त्यापैकी बोंद्रे एक. काँग्रेस सोडण्याचा विचार करताना या दोघांच्या बोंद्रेंनी अनेकदा भेटी घेतल्या. त्यामुळेच बोंद्रे यांना थांबवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनीच मध्यस्थी केल्याचे दिसून आले. त्यांनी स्वतः बोंद्रे यांचे कॉन्फरन्स कॉलवरती राहुल गांधींसोबत बोलणे करून दिले.

Rahul Bondre Stays with Congress After Rahul Gandhi Call
Congress News: राहुल गांधींचा फोन अन् काँग्रेसचा नेता भाजपच्या उंबरठ्यावरुन परत फिरला, फडणवीसांच्या खासगी सचिवांनी आमदार पत्नीसाठी टाकलेला डाव फसला?

सपकाळ आणि गांधी यांच्या या फोनमागे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे असल्याचेही बोलले जाते. बुलढाणा सपकाळ यांचं होमग्राऊंड आहे. शिवाय राहुल बोंद्रे यांची शैक्षणिक आणि इतर संस्थांमुळे मोठी राजकीय ताकद आहे. स्वतःच्याच जिल्ह्यातून एखादा मोठा नेता भाजपमध्ये जाणे ही सपकाळ यांच्यासाठी मोठी नामुष्की ठरली असती. शिवाय बोंद्रे यांना थांबवण्यासाठी सपकाळ यांनी कोणतेच प्रयत्न न करणे हा राज्यातील काँग्रेससाठी चुकीचा संदेश ठरला असता.

बोंद्रेंच्या रुपाने काँग्रेसने मोठा नेता गमावलाच असता शिवाय चिखली मतदारसंघातील भाजपविरोधातील व्होटबँक शिवसेनेकडे जाण्याची भीती होती. याचा फटका २०२९ च्या निवडणुकीत बसला असता. सध्या चिखली मतदारसंघात शिवसेना आमदार संजय गायकवाड कमालीचे अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांना २०२९च्या निवडणुकीत चिखलीतून मैदानात उतरवले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

Rahul Bondre Stays with Congress After Rahul Gandhi Call
BJP News : जिल्हाध्यक्षाची खुर्ची अन् आमदारकीची संधी; मराठवाड्यात सात जणांना लागली लॉटरी...

या चर्चेला आधार देणाऱ्या अनेक राजकीय घडामोडीही अलीकडच्या काळात घडल्या आहेत. आमदार गायकवाड यांनी चिखली मतदारसंघात विविध राजकीय मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. त्याचबरोबर संधी मिळेल तेव्हा विद्यमान आमदारांच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

कुणाल यांच्या वाढदिवशी शक्तिप्रदर्शन

नुकताच स्वातंत्र्यदिनी कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस झाला. त्यानंतर चिखली मतदारसंघातील धाड येथील दहीहंडी कार्यक्रमालाही कुणाल आणि संजय गायकवाड उपस्थित होते. या निमित्ताने चिखलीत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन झाले. खुल्या जीपमधून कुणाल गायकवाड यांची मिरवणूक काढण्यात आली.

नांदेड किंवा मुंबईसह इतर मतदारसंघात एखादा नेता भाजपमध्ये जाणे म्हणजे पक्ष संपणे ही भीती काँग्रेसला जाणवली नसावी. पण चिखलीमध्ये ही भीती जाणवली. याच सगळ्या शक्यतांमुळे आणि भीतीमुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी करून थेट राहुल गांधींमार्फत केल्याची माहिती आहे. आता बोंद्रे यांचा टळलेला पक्षप्रवेश काँग्रेसला आगामी निवडणुकीत कितपत फायद्याचा ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com