Rahul Gandhi News : राहुल गांधींची शिक्षा कायम, आशिष देशमुख म्हणाले 'ते' वक्तव्य खरे ठरले !

Dr. Ashish Deshmukh : राहुल गांधी यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
Dr. Ashish Deshmukh and Rahul Gandhi
Dr. Ashish Deshmukh and Rahul GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Dr. Ashish Deshmukh on Rahul Gandhi's sentence remains : २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ओबीसींवरील अपमानास्पद वक्तव्यासंबंधी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयात राहुल गांधी यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. (He was dismissed from the Congress on this issue)

राहुल गांधी यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असून त्यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये असताना केली होती. त्यानंतर याच मुद्यावर त्यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्यात आले होते.

काल (ता.सात जुलै) गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी आडनाव’ टिप्पणीविरोधातील खटल्यात राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना सुनावलेली दोन वर्षाची शिक्षा कायम आहे. कॉंग्रेसकडून देशभर या निर्णयाचा विरोध केला जात असताना भाजपमध्ये मात्र आनंद व्यक्त केला जात आहे.

कॉंग्रेस नेते, माजी आमदार व नुकतेच भाजपमध्ये प्रवेश घेतलेले डॉ. आशिष देशमुख म्हणाले की, संपूर्ण देशात ५४ टक्के ओबीसी समाज आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याने त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे राहुल गांधी यांनी माफी मागून हा विषय इथेच संपवावा, ही माझी भूमिका होती. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला तर राहुल गांधी अडचणीत येतील, असे मी त्यावेळी म्हटले होते.

Dr. Ashish Deshmukh and Rahul Gandhi
Ashish Deshmukh News : विदर्भातून नानागिरी, काटोलातून काकागिरी आणि सावनेरातून दादागिरी संपवायची आहे !

माझे ते वक्तव्य गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाने आज खरे ठरले आहे. हा निर्णय देऊन उच्च न्यायालयाने ओबीसींच्या भावनांचा आदर केला आहे. पुढील आठ वर्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) कोणतीही निवडणूक लढू शकणार नाहीत. ओबीसी समाजाला या निर्णयामुळे आनंद झाला आहे. मी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

ओबीसी (OBC) आणि विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी नेहमीच परखड भूमिका घेतली आहे. २०१४मध्ये भाजपच्या तिकिटावर काटोल मतदारसंघातून आमदार झालेल्या देशमुख यांनी विदर्भाच्या मुद्द्यावरच नंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये गेले. पण तेथेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे जमले नाही. शेवटी तेथूनही राजीनामा देऊन ते भाजपमध्ये परतले आणि कॉंग्रेस नेत्यांवरील टीकेची धार अधिक तीव्र केली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.