Gadchiroli News : लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने मोदी सरकारवर आपला राग काढला. आता रागाची वाफ निघून गेली आहेत. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्यालाच मते मिळतील या भ्रमात राहू नये असे सांगून मनसेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच राज्यात चित्र वेगळे राहील असे भाकित वर्तविले.
आत्तापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 6 उमेदवार ठाकरेंकडून घोषित करण्यात आले. चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी उमेदवार घोषित करताच चंद्रपूरमध्ये मनसैनिक भिडले आहेत. दोन गटात हाणामारी झाली आहे.
सध्या राज ठाकरे (Raj Thackeray) विदर्भ गुरुवारी (ता.22) दौऱ्यावर आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट घेतली. मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हयातील राजकीय स्थिती जाणून घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवादही साधला.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात विधानसभेसाठी आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. सध्या पक्षाची स्थिती व पक्ष पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आहोत. अनेक नवतरुण पुढे येण्यास उत्सुक आहेत. त्यांचाही विचार करण्यास येईल.
गडचिरोलीसह काही ठिकाणी फेरबदल करण्यात येतील. लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना त्यांनी लोकं अशा योजनांना भुलत नाहीत. ते लाभ नक्की घेतात. परंतु, ज्यांना द्यायचे त्यांनाच देतात. लोकसभेत विरोधी पक्षांना झालेले मतदान हे सरकारवरच्या नाराजीतून होते. म्हणून विरोधी पक्षांनी फार हुरळून जाऊ नये. विधानसभेत परिस्थिती वेगळी असेल. त्यावर सध्याच काही भाष्य करता येणार नाही. पण आमची विधानसभेची तयारी सुरू झाल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
सध्या पक्षफोडी, बंडखोरीने महाराष्ट्राचे राजकारण भलत्याच वळणावर गेले आहे. बंडखोरांचा सुकाळ आहे. कुणालाही वाटते आपण उमेदवार होऊ शकतो, जिंकू शकतो आणि विकले जाऊ शकतो. अशांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.