Raj Thackeray : राज ठाकरेंचा मोठा निर्णय; इतर पक्षातील बंडखोरांना मनसेची उमेदवारी देणार नाही

Assembly Election 2024 : अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढविणार की नाही, याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. अमित ठाकरे हे गुपचूप निवडणूक लढवणार नाही, तेव्हा जेव्हा निवडणूक लढवतील, तेव्हा तुम्हालाही समजणार आहेच, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 22 August : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मात्र, इतर पक्षांमधील बंडखोरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी देणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले.

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे विदर्भाच्या (Vidharbh) दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यात ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्प मारताना विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) उमेदवारीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबतची माहिती दिली.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी लढत होण्याची शक्यता आहे. आघाडी आणि युतीमध्ये तीन पक्ष असल्याने विधानसभा निवडणुकीत बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. मात्र, इतर पक्षातील बंडखोरांना मनसेची उमेदवारी देणार नाही, असा ठाकरी बाणा राज ठाकरे यांनी बोलून दाखवला.

Raj Thackeray
Jayshree Patil : सांगली काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ; जयश्री पाटलांची कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढण्याची घोषणा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाबाबत राज यांनी भाष्य केले. लोकसभेला शरद पवार, उद्धव ठाकरे यांना पाहून मतदान झालेले नाही, तर ते मोदीविरोधातील मतदान आहे. त्या वेळी राज्यातील एससी समाज आणि मुस्लीम समाजाने महाविकास आघाडीला मतदान केले होते. पण, विधानसभेत ते मतदान महाविकास आघाडीलाच मिळेल, असे होणार नाही. कारण प्रत्येक निवडणूक वेगळी असते, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले.

अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढविणार की नाही, याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. अमित ठाकरे हे गुपचूप निवडणूक लढवणार नाही, तेव्हा जेव्हा निवडणूक लढवतील, तेव्हा तुम्हालाही समजणार आहेच, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपण निवडणूक लढवणार नसल्याचेही राज यांनी या वेळी स्पष्ट केले.

Raj Thackeray
Ajit Pawar : ‘मी पुन्हा येईन’ चा शब्द अजितदादा पाळणार का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना विदर्भातील बहुतांश जागांवर विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. मात्र, केवळ निवडणूक लढण्यासाठी म्हणून मनसे उमेदवार उभे करणार नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com