VIDEO : CM शिंदे अन् फडणवीसांविरोधात 'मनसे'चे उमेदवार देणार? राज ठाकरेंनी चार वाक्यात विषय संपवला

Raj Thackeray News : आमच्यासाठी पोषक वातावरण आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpg
eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpgsarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी महायुती सरकारला 'बिनशर्त' पाठिंबा दिला होता. पण, विधानसभेला राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला असून त्यांनी उमेदवारही घोषित केले आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही मनसेचे उमेदवार असतील का? यावर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मराठवाड्यानंतर राज ठाकरे ( Raj Thackeray ) विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

200 ते 225 जागा लढविणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. त्यासह आतापर्यंत राज ठाकरेंनी 7 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पांचपाखाडी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मनसेचे उमेदवार असतील का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला.

eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpg
Raj Thackeray : '...तर यांची चौरंग केली पाहिजेत'; महाशक्तीची आठवण करत राज ठाकरे गरजले

त्यावर राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं आहे. "सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"टप्प्या-टप्प्यानं उमेदवार जाहीर करू"

"सर्वसाधारण दिवाळीनंतर निवडणुका लागतात. मात्र, आमचारसंहिता लागत नसल्यानं निवडणुकीबद्दल खात्री नाही. उमेदवार चाचपणीसाठी हा दौरा आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. पुढे टप्प्या, टप्प्यानं उमेदवार जाहीर करू," असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpg
Raj Thackeray News: 'लोकसभेला मोदींवरचा राग निघाला; आता ठाकरे-पवारांनी आपल्यालाच मते मिळतील या भ्रमात राहू नये..!'

"मुस्लिम समाजानं मोदी-शहांविरोधात मतदान केलं"

"प्रत्येकाला निवडणुकीत उभे राहायचं आहे. मात्र, आमच्यासाठी पोषक वातावरण आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. लोकसभेला ज्या पद्धतीनं मतदान झालं, ते समजून घेतलं पाहिजे. देशातील एक गठ्ठा मुस्लिम समाजानं मोदी-शहांविरोधात मतदान केलं. गलिच्छ राजकारण लोक विसरले नाहीत. मतदारांशी प्रतारणा झाली. असा चिखल कधीही झाला नव्हता. त्याचा राग मतदार नक्की काढतील," असं राज ठाकरेंनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com