Vidarbha MNS : विदर्भात मनसेतून कोण लढणार?

Vidarbha MNS Raj Thackeray : मनसेची स्थापना झाली तेव्हा नागपूरमध्ये दोन नगरसेवक निवडूण आले होते. नंतरच्या निवडणुकीत ही संख्या एकवर आली. सध्या शून्य झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी राज ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांनी विदर्भाबाबत फारच गांभीर्य दाखवलं होतं.
MNS, Raj Thackeray
MNS, Raj ThackeraySarkarnama

Nagpur News, 15 June : आमचे पोट्टे उद्या प्रस्थापित नेत्यांच्या डोक्यावर वरंवटा फिरवतील असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे नागपूरमध्ये बोलले होते. डिसेंबर महिन्यात नागपूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलले.

मात्र, त्यानंतर सुमारे सहा महिन्यांपासून एकही मोठा पदाधिकारी नागपूरमध्ये (Nagpur) फिरकला नाही. संपर्क नेत्यालाही कोणी बघितले नाही. अशी परिस्थिती विदर्भात असताना विधानसभा निवडणूक कोण लढणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख म्हणून पुन्हा राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पक्षाच्यावतीने नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली. राज्यातील सुमारे अडीचशे जागा लढणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. यापैकी विदर्भात 66 जागा आहेत. या संदर्भात काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता कशाच्या बळावर निवडणूक लढायची असा त्यांचा प्रश्न आहे.

मनसेची स्थापना झाली तेव्हा नागपूरमध्ये दोन नगरसेवक निवडूण आले होते. नंतरच्या निवडणुकीत ही संख्या एकवर आली. सध्या शून्य झाली आहे. शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी राज ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांनी विदर्भाबाबत फारच गांभीर्य दाखवलं होतं. अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला.

MNS, Raj Thackeray
Sharad Pawar : ...म्हणून शरद पवारांनी मानले मोदींचे आभार

तर युवा नेत्यांच्या हाती पक्षाची कमान सोपवली होती. स्वतः राज ठाकरे दोन दिवस मुक्कामाला होते. रविभवन शासकीय निवसस्थानी त्यांनी मुक्काम केला होता. जिल्हानिहाय बैठका घेतल्या. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले आणि जुनी संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता. शिवसेनेला कडवे आव्हान उभे केले जाईल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र हा उत्साह महिनाभर टिकला. नेत्यांनीच विदर्भात येणे बंद केले.

आता तर मुंबईचे नेते फोनसुद्धा उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत. विदर्भाकडे कोणी लक्ष देत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विदर्भातील 66 मतदारसंघात एबी फॉर्म घेऊन जरी फिरलो तरी उमेदवार लढायला तयार होणार नाहीत, अशी अवस्था येथे आहे. प्रथमच विदर्भातील एका कार्यकर्त्याला पक्षाचा नेता म्हणून पदोन्नती देण्यात आली.

MNS, Raj Thackeray
Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदी अन् अमित शाहांवर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; म्हणाले, देश अन्...

सध्या जिल्हा प्रमुख, शहर प्रमुखांकडे कामच नाही. पक्षातर्फे कुठलाच कार्यक्रम राबवला जात नाही. विदर्भात भाजप आणि काँग्रेस असे दोन मोठे पक्ष आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी पक्षाचे मोठे पाठबळ लागते. ते सध्यातरी मिळताना दिसत नसल्याचे मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com