होळीसाठी राणा दाम्पत्य मेळघाटात; आदिवासींसोबत राणांचे नृत्य...

यंदा सलग12 व्या वर्षी राणा दाम्पत्य आपली परंपरा जोपासत धारणी, चिखलदरा, चुरणी आदी भागातील अतिदुर्गम गावांमध्ये जाऊन होळीपूजन करणार आहेत.
Navneet Rana News, Ravi Rana News, Navneet and Ravi Rana in Melghat News
Navneet Rana News, Ravi Rana News, Navneet and Ravi Rana in Melghat NewsSarkarnama
Published on
Updated on

मेळघाट : दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या स्वागतासाठी धारणी, चिखलदरा तालुक्यातील आदिवासी बंधू भगिनी व युवा स्वाभिमान कार्यकर्ते होळी निमित्य आज (ता.18 मार्च) मेळघाट मध्ये दाखल झाले आहेत. होळी हा आदिवासींचा महत्वाचा सण आहे. स्वतःला मेळघाटची कन्या समजणाऱ्या व आदिवासींसोबत आपले घट्ट नाते जोपासणारे राणा दांपत्य हे दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी सण हा आदिवासी बंधू भगिनींसोबत उत्साहात साजरी करणार आहे. (Navneet and Ravi Rana in Melghat News)

Navneet Rana News, Ravi Rana News, Navneet and Ravi Rana in Melghat News
महाराष्ट्राच्या 'आमदार निवास'मध्ये थिरकणार सनी लियोनी...

यंदा सलग 12 व्या वर्षी राणा दाम्पत्य आपली परंपरा जोपासत धारणी, चिखलदरा, चुरणी आदी भागातील अतिदुर्गम गावांमध्ये जाऊन होळीपूजन करणार आहेत. मेळघाट दौऱ्यावर असतांना आदिवासी बांधवासोबत खासदार राणा ढोल वाजवत त्यांच्या नृत्यात सहभाग घेतला. आदिवासींसाठी होळी महत्वाचा सण आहे. स्वतःला मेळघाटची कन्या समजणाऱ्या व आदिवासींसोबत आपले घट्ट नाते जोपासणारे राणा दांपत्य दरवर्षीप्रमाणे यंदाचीही होळी आदिवासी बंधू भगिनींसोबत होळी साजरी करीत आहे.

Navneet Rana News, Ravi Rana News, Navneet and Ravi Rana in Melghat News
Video: 'पैशांसाठी अशी कामं करत नाही'

राणा दाम्पत्य आपल्या मतदारसंघात जवळपास सर्वच सणांमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी घेतांना पाहायला मिळते. नवरात्री उत्सवात खासदार नवनीत राणा या महिलांसोबत गरबा खेळतांना दिसल्या होत्या. तर कधी त्या खेळांमध्येही सहभाग घेतांना त्या दिसतात. यंदा कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राणा दाम्पत्य मेळघाटात होळी साजरी करण्यासाठी आदिवासी बांधवामध्ये गेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com