राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? पुढील सुनावणी २२ ऑगस्टला

Amaravati Politics | नवनीत राणा व अपक्ष आमदार रवी राणा या दाम्पत्याचा जामीन रद्द करावा अशी मागणी करण्यात आली होती.
Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Shivsena Latest News
Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Shivsena Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

अमरावती: हनुमान चालिसाप्रकरणी अमरावतीचे राणा दांपत्य जामिनावर बाहेर आहेत. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यापासून ते न्यायालयीन प्रक्रियेत कोणतेही सहकार्य करत नाहीयेत, असा आरोप सरकारी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. तसेच, राणा दाम्पत्यच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात यावं अशी मागणी मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी पक्षाच्या वकिलांनी यावेळी केली होती. (Amaravti Latest Political news)

या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय या अर्जावरील सुनावणी पुर्ण झाली असून येत्या 22 ऑगस्टला या सुनावणीवर निर्णय देण्यात येणार आहे. जामिनाच्या अटीचा भंग केल्याने अपक्ष खासदार नवनीत राणा व अपक्ष आमदार रवी राणा या दाम्पत्याचा जामीन रद्द करावा अशी विनंती करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या करण्यात आली होती. या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली. आता २२ ऑगस्टला न्यायालय यावर निर्णय देणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होऊन ते पुन्हा गजाआड जाणार की, पोलिसांचा अर्ज फेटाळला जाणार हे सोमवार 22 ऑगस्ट रोजी स्पष्ट होणार आहे.

Navneet Rana Ravi Rana Latest News in Marathi, Shivsena Latest News
तर... मी शहीद झालो असतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खळबळजनक वक्तव्य

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याच्या घोषणेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोघांना 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. आमदार-खासदारां विरुद्धच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी 4 मे रोजी राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर राणा दाम्पत्याने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर असे कोणतेही विधान केलेले नाही. त्यांनी केवळ एकदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माध्यमे लोकांपर्यंत पोहोचण्याचे एक साधन असते. न्यायालयाचा अवमान होईल, असे कोणतेही कृत्य त्यांनी केलेले नाही, असा युक्तिवाद राणा दाम्पत्याचे वकली मर्चंट यांनी न्यायालयात केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com