Dhangar Reservation : धनगर आरक्षणाची बाजू न्यायालयात कोण मांडणार, आमदार राणाजगजितसिंह म्हणाले...

Ranajagjitsinha Patil : अहिल्यादेवींच्या तुळजापूरातील स्मारकासाठी १ कोटींची तरतूद
Ranajagjitsinha Patil meeting
Ranajagjitsinha Patil meetingsarkarnama
Published on
Updated on

Nagpur : धनगर समाजाला आरक्षणच देण्याचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट असल्याने यात समाजाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील व त्यांच्या जोडीला नामांकित जेष्ठ विधीज्ञ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी दिली . तुळजापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या भव्य स्मारकासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या सोबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत तसा निर्णय झाल्याचे आमदार पाटील म्हणाले.

Ranajagjitsinha Patil meeting
Mallikarjun Kharge : 'इंडिया' आघाडीच्या पंतप्रधानपदासाठी 'हे' नाव ममता बॅनर्जींनी सुचवलं

आमदार राणाजगजितसिंह यांनी धनगर आरक्षण व समाजाचे इतर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घेण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे मागणी केली होती. त्याअनुषंगाने मंगळवारी नागपूर येथे विधान भवनात मंत्री सावे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे,धनगर समाजाचे नेते बाळासाहेब खांडेकर अरविंद पाटील,राम जवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुळजापूर येथे देशविदेशातील भाविक मोठ्या संख्येने आई तुळजाभवानी च्या दर्शनासाठी येत असतात.तुळजापूर येथे जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे पूर्णाकृती पुतळा असलेले भव्य असे स्मारक उभे केले तर त्याच्या माध्यमातून देशविदेशातील नागरिकांना अहिल्यादेवींचा इतिहास माहिती होईल त्यामुळे तुळजापूर येथे स्मारक उभारण्याबाबत देखील चर्चा बैठकीत झाली.

नियोजित स्मारकासाठी शासकीय विश्रामगृहाची जागा देण्यासाठी कायदेशीर अडचणी येत असून नगरपालिकेकडे जर सदर जागा हस्तांतरित केली तर ती अडचण दूर होईल ही बाब आ.पाटील यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तातडीने प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.तसेच स्मारक भव्य व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.

(Edited By Roshan More)

Ranajagjitsinha Patil meeting
Shirdi Saibaba Sansthan : राज्य सरकारकडून साई संस्थानचे 'CEO' तडकाफडकी कार्यमुक्त!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com