Mahayuti News : शिंदेसेनेच्या 'त्या' उमेदवाराला रवी राणांचा विरोध; मुख्यमंत्र्यांना दिला इशारा, महायुतीतील वाद चव्हाट्यावर

Ravi Rana On Bachchu Kadu, Eknath Shinde : "बच्चू कडूंनी महायुतीचं पालन केलं नाही. त्यामुळे संपूर्ण मेळघाटची मागणी आहे की, मेळघाटमध्ये एकतर कमळ पाहीजे, नाहीतर युवा स्वाभिमान पक्ष पाहिजे. दर्यापूर मतदारसंघात देखील अजून कोणाला जाईल हे निश्चित झालेलं नाही. जेव्हा होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ."
Ravi Rana, Bachchu Kadu, Eknath Shinde
Ravi Rana, Bachchu Kadu, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Amravati News, 08 Oct : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवरच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील (Mahayuti) प्रमुख नेत्यांच्या जागावाटपा संदर्भातील बैठकींचा जोर वाढला आहे.

एकीकडे वरिष्ठ नेते युती आघाड्यांमधील वाद मिटवून जागावाटप करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांमधील वादामुळे जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुतींचा बनत चालला आहे.

अशातच आता अमरावती (Amravati) जिल्ह्यात जागावाटपावरून महायुतीत मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मेळघाटमध्ये शिवसेनेने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्याविरोधात युवा स्वाभिमान पार्टीचा उमेदवार उभं करू असा इशाराच आमदार रवी राणा यांनी दिला आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवा नाही.

Ravi Rana, Bachchu Kadu, Eknath Shinde
Haryana Election Result : हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसचा धुव्वा..; 'ही' आहेत महत्त्वाची 5 कारणं

लोकसभा निवडणुकीतही कडू यांच्यामुळेच नवनीत राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता राणा यांनी तोच राग मनात ठेवत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बच्चू कडू यांच्यात साटंलोटं असल्याचा आरोप देखील केला आहे.

प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना शिवसेना (Shivsena) शिंदे गटात बच्चू कडूंनीच पाठवलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात साटंलोटं आहे. तर राजकुमार पटेल यांना उमेदवारी देणं ही बच्चू कडू यांचीच ही खेळी असल्याचा मोठा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

तसंच जर मेळघाटमध्ये शिंदेसेनेने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पार्टीचा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणू, असा इशाराही राणा यांनी दिला आहे. त्यामुळे पटेल यांच्या उमेदवारी विरोधात रवी राणा आता चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

Ravi Rana, Bachchu Kadu, Eknath Shinde
Raju Shetti MHADA House : राजू शेट्टींना लागली लॉटरी; मुंबईत मिळालं हक्काचं घर!

बच्चू कडूंनी महायुतीचं पालन केलं नाही

दरम्यान, बच्चू कडूंनी महायुतीचं पालन केलं नाही. त्यामुळे संपूर्ण मेळघाटची मागणी आहे की, मेळघाटमध्ये एकतर कमळ पाहीजे, नाहीतर युवा स्वाभिमान पक्ष पाहिजे. दर्यापूर मतदारसंघात देखील अजून कोणाला जाईल हे निश्चित झालेलं नाही. जेव्हा होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ, असं म्हणत राणा यांनी दर्यापूर मतदारसंघावरही दावा केल्याचं पाहायला मिळत आहे.

बाहेरचं पार्सल चालणार नाही

"दर्यापूर मतदारसंघात आम्हाला बाहेरचं पार्सल अजिबात चालणार नाही. या मतदारसंघात केवळ भाजपचाच उमेदवार निवडून येईल शिवाय तो अमरावती जिल्ह्यातीलच राहील", असं म्हणत राणा यांनी अभिजित अडसूळ यांना टोला लगावला. सोमवारी दर्यापूरमध्ये शिवसेनेचा मेळावा पार पडला. यावेळी अभिजित अडसूळ यांनी दर्यापूरच्या जागेवर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांचे नाव न घेता निशाणा साधला. त्यामुळे आता या मतदारसंघावरून महायुतीत मोठा वाद होण्याची चिन्ह आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com