Ravi Rana : विधानसभा निवडणुकीत नवनीत राणांना उमेदवारी? रवी राणांनी दिलं उत्तर

Assembly Elections Ravi Rana Navneet Rana : अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघासाठी भाजपच्या समन्वयकपदी 'युवा स्वाभिमान' पक्षाचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार रवी राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Navneet Rana, Ravi Rana
Navneet Rana, Ravi Rana Sarkarnama
Published on
Updated on

Ravi Rana News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आठ दिवसांत घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकसभेला पराभूत झालेल्या भाजप उमेदवार या विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आमदार रवी राणा यांनी या चर्चा फेटाळून लावत नवनीत राणा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले.

रवी राणा म्हणाले, नवनीत राणा या भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. मात्र, त्या स्वतः निवडणूक लढणार नाही.

'भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी, नेत्यांनी नवनीत राणा यांना राज्यसभेवर संधी देणार असल्याचे आधीच सांगितले आहे. नवनीत राणा या राज्यसभेवर जाणार आहेत. मला वाटते त्यांच्यासाठी राज्यसभाच योग्य आहे', असे देखील रवी राणा यांनी म्हटले.

Navneet Rana, Ravi Rana
Indapur Politic's : आम्ही जेलमध्ये बसू; पण इंदापुरातून विधानसभा लढूच; पवारांच्या निकटवर्तीय नेत्याची घोषणा

रवी राणांवर मोठी जबाबदारी

अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघासाठी भाजपच्या समन्वयकपदी 'युवा स्वाभिमान' पक्षाचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार रवी राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार राणा यांना भाजपकडून थेट एका मतदारसंघाच्या समन्वयकपदासारखी मोठी जबाबदारी दिल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. रवी राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या देखील चर्चा सुरू होत्या. मात्र, रवी राणा यांनीच ही चर्चा फेटाळून लावली आहे.

बच्चू कडू विरुद्ध रवी राणा

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून उमेदवार उभा करण्यात आला होता. बच्चू कडू यांच्यामुळेच आपला पराभव झाल्याचा राग नवनीत राणा यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील रवी राणा विरुद्ध बच्चू कडू असे चित्र पाहण्यास मिळण्याची शक्यती आहे. कारण अचलपूरची जनता बच्चू कडू यांना धडा शिकवणार, असे म्हणत रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकी बच्चू कडू यांच्या विरोधात काम करण्याचे संकेत दिले होते.

Navneet Rana, Ravi Rana
K P Patil and A Y Patil : राधानगरी मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता, पाटील मेहुणे अन् पाहुणे काय करणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com