Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचे नेमकं काय ठरलंय !

Ravikant Tupkar leader of Swabhimani Shetkari Sangathana : रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक लढली होती. तब्बल अडीच लाख मते घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचे गणित बिघडवले होते.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : शेतकऱ्यांचे मुद्दे कायम दुर्लक्षित आहेत. शेतकरी, शेतमजुराची चळवळ उभी करून तिसरा पर्याय महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बच्चू कडू आणि आमचे तसं ठरलं आहे, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधानसेची निवडणूक लढण्याचा निर्धार बोलून दाखवला.

रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक लढली होती. तब्बल अडीच लाख मते घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचे गणित बिघडवले होते. आता बुलढाण्यातील सर्व मतदारसंघात ते शेतकरी संघटनेचे उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. वाढदिवसानिमित्त तुपकर यांनी आज बच्चू कडूंची भेट घेतली. ते म्हणाले, आमची यापूर्वीच तिसऱ्या फ्रंटसाठी चर्चा झाली होती. आज त्यावर प्राथमिक बोलणे झाले. तेसुद्धा महायुतीशी संबंध तोडतील याविषयी सकारात्मक दिसत आहेत.

Ravikant Tupkar
Chandrapur Assembly Election : खासदार प्रतिभा धानोरकरांनी चंद्रपूरसाठी पुन्हा लावली ‘फिल्डिंग’; विधानसभेसाठी बडा मासा गळाला!

शेतकऱ्यांची वोट बँक तयार करण्यामध्ये आजवर तितकस यश आम्हाला आले नाही. दिवंगत शरद जोशी यांनी आम्हाला घडवले. त्यांच्याच विद्यापीठात आम्ही वाढलो. राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे भूमिका त्यांनाच विचारा. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आता कोणासोबत जातील ते आम्हाला माहीत नाही. आम्ही मात्र बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढणार आहोत. स्वतंत्रपणे आम्ही लढण्याची तयारी सुरू केली आहे.

Ravikant Tupkar
Nagpur Congress : पक्षासाठी वेळ नसेल तर राजीनामा द्या, काँग्रेस शहराध्यक्षांनी ठणकावले !

आम्ही अपक्ष लढलो म्हणजे मत विभाजन होते असे नाही. लढणारे लोक जर सभागृहात आले तर प्रस्थापित्यांच्या नाकात दम आणतील. त्यामुळे त्यांना सभागृहात येऊ देऊ नका असेच प्रयत्न केले जात असतात. माझ्या विरोधात मुख्यमंत्र्यांना महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासाठी गल्लोगल्ली फिरावे लागले. मला अडीच लाख मत मिळाले.

ही मते काही अमेरिकेतून आली नाहीत. ती शेतकरी शेतमजुरांनी दिले. प्रतापराव जाधव यांच्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही. आतापर्यंत लोक विचारत होते, तुमचे खासदार कोण आहे. अकोल्यातील जवान शहीद झाला. त्यांच्या घरी जायला प्रतापराव जाधव यांना वेळ मिळाला नाही. माझ्यासारखे फाटक्या माणसावर केंद्रीय मंत्री जाधव यांना पंधरा मिनिटे बोलावे लागते. याचा अर्थ त्यांना कुठे आग लागली हे सांगायची गरज नसल्याचेही तुपकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com