'सह पालकमंत्री' हा काय प्रकार? सावकारेंच्या नियुक्तीवर शेतकरी नेता संतापला; सरकारवरही हल्लाबोल

Ravikant Tupkar On Sanjay Sawkare appointment : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री असेल.
Mahayuti : Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Mahayuti : Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सह पालकमंत्री पदावर संताप व्यक्त केला.

  2. त्यांनी या पदाला संविधानिक मान्यता नाही, असा दावा केला.

  3. महायुती सरकार राजकीय सोयीसाठी या पदाचा वापर करत असल्याची टीका केली.

Buldhana News : 'सह पालकमंत्री' हा काय प्रकार आहे? हे पदच संविधानिक नाही. यामुळे काय फरक पडणार आहे? अशा शब्दात संताप व्यक्त करून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पालकमंत्री पदाचा वापर राजकीय सोयीसाठी केल्या जात असल्याने महायुती सरकारवर टीका केली.

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडून भंडारा जिल्ह्याचे पालकत्व काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची नियुक्ती केली आहे. सावकारे यांना बुलढाणाऱ्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री करण्यात आले आहे. बुलडाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आहेत. ते साताऱ्याचे तर सावकारे भुसवाळचे आमदार आहेत.

Mahayuti : Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Ravikant Tupkar News : कर्जमुक्तीच्या आश्वासनापासून दूर पळाल तर नरडीचा घोट घेऊ! स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक

सावकारे भंडारा जिल्ह्यात काम करण्यास इच्छुक नव्हते. भुसावळवरून भंडारा येथे येण्यासाठी सात ते आठ तास लागत होते. त्यामुळे ते मोजक्याच कार्यक्रमांना उपस्थिती लावत होते. त्यांनीच भंडारा जिल्ह्यातून मुक्त करा, अशी विनंती केली होती. आता असा दावा केला जात आहे. दुसरीकडे त्यांना मनापासून काम करू दिले जात नव्हते. भाजपच्या काही आमदारांच्या त्यांच्यावर दबाव होता, अशीही कुजबूज होती.

एकंदरीत येथील वातावरण पाहता त्यांनी स्वतःच भंडारा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कोणी काही करूच देणार नसेल तर काय करणार अशी प्रतिक्रिया त्यांनी यापूर्वी खाजगीत व्यक्त केली होती. यावरून त्यांच्यावर दबाव होता असा दावा केला जात आहे.

भंडाराचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांचा कोणाशीच वाद नव्हता, त्यांनीच भंडारा सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती असे सांगितले. मात्र आम्हाला जिल्हा नियोजन समितीतून निधी दिला जात नव्हता, शिवसेनेच्या आमदारांना निधी देऊ नका असे कोणी सांगत असेल, तर तो चुकीचे आहे असे सांगून भाजपच्या दबावतंत्राकडे लक्ष वेधले. पंकज भोयर वर्ध्याचे आमदार आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. भंडाऱ्याचे पालकत्व सोपवून त्यांच्या दोन जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यावर दोन पालकमंत्री लादल्याने रविकांत तुपकर यांनी आणखी 10 पालकमंत्री नियुक्त करा, मात्र त्यामुळे काही फरक पडणार आहे का अशी विचारणा केली. राज्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. ऐन मोसमात पाऊस नव्हता. त्यानंतर अति पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर केली जाईल असे वाटत होते. मात्र असे काही होताना दिसत नाही. फक्त पालकमंत्र्यांना हलवले जात असल्याची टीकाही तुपकर यांनी केलीय.

Mahayuti : Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
Ravikant Tupkar : क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वाढवले महायुतीचे टेन्शन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिला अल्टीमेटम

FAQs :

प्रश्न 1: सह पालकमंत्री पद संविधानिक आहे का?
उत्तर: नाही, हे पद संविधानिक नाही असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

प्रश्न 2: रविकांत तुपकर यांनी कोणावर टीका केली?
उत्तर: महायुती सरकारवर टीका केली.

प्रश्न 3: सह पालकमंत्री पदाविषयी तुपकरांचे म्हणणे काय आहे?
उत्तर: हे पद केवळ राजकीय सोयीसाठी वापरले जात आहे.

प्रश्न 4: सह पालकमंत्री पदावरून कोणत्या पातळीवर वाद निर्माण झाला?
उत्तर: महाराष्ट्रातील राजकारणात मोठा वाद निर्माण झाला.

प्रश्न 5: या वादाचा परिणाम कशावर होऊ शकतो?
उत्तर: सरकारच्या विश्वासार्हतेवर आणि राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com