NCP News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांच्या भूमिकेने खळबळ; नेत्यांमध्ये चलबिचल वाढली

Anil Deshmukh Reacts to Sharad Pawar and Ajit Pawar NCP Reunion in Nagpur : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही, यावर नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.
Ajit Pawar and Sharad Pawar
Ajit Pawar and Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Anil Deshmukh on NCP development : दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी 'इंडियन एक्सप्रेस' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती याबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याविषयी काय सांगाल? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर पक्षात दोन मते आहेत. आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीबरोबर पुन्हा एकत्र यावे असे एका गटाला वाटते. तर आम्ही भाजपाबरोबर जाऊ नये, इंडिया आघाडीत पुन्हा सामील होऊन युतीची पुनर्रचना करावी असे दुसऱ्या गटाला वाटते, असे स्पष्ट उत्तर शरद पवार यांनी दिले.

Ajit Pawar and Sharad Pawar
Operation Sindoor: कुणाच्या शवपेटीवर पाकिस्तानच्या लष्करप्रमुख, राष्ट्रपतींनी अश्रू ढाळले; मारला गेलेला दहशतवादी मसूद, हाफिज की दुसरा कोण?

तसेच याबाबत नेत्यांनी एकत्र बसून ठरवावे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत विचार करावा, संसदेत विरोधी पक्षात बसायचे की नाही हे ठरविण्यासाठी तिला भूमिका घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या विधानानंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Ajit Pawar and Sharad Pawar
Top 10 News : मोदींनी दिला होता 'ऑपरेशन सिंदूर'चा संकेत; कोल्हापुरात काँग्रेस फुटणार? - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

याबाबत राज्याचे माजी गृहमंत्री आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भाचे नेते अनिल देशमुख यांना विचारणा केली असता त्यांनी, असे काही होईल असे वाटत नसल्याचे सांगितले. मुलाखतीत ते काय बोलले याबाबत नेमकं काय सांगायचे ते शरद पवार साहेबच सांगू शकतात, असे सांगून त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा फेटाळून लावली.

दीड दोन वर्षांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावे, यावर सतत कोणी ना कोणी बोलत असतं. याचाच संदर्भ त्यांनी मुलाखतीत दिला. त्यांची भावना मांडली. मात्र याबाबत खरे काय ते शरद पवार हेच सांगू शकतात. आम्ही आमच्या पक्षाला मजबूत करण्याचे प्रयत्न करीत आहोत. येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता आम्ही कामाला लागलो आहे. संपूर्ण जिल्हा कसा मजबूत करता येईल या दृष्टीने काम सुरू आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com