Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंना मिळणार आवडीचे खाते; मात्र, महत्वाच्या मंत्रिपदावर सोडावे लागणार पाणी

Eknath Shinde Shivsena Portfolio : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस आधी मंत्रिपदाच्या वादावर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 13 December : मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख एका दिवसावर येऊन ठेपली असून ठरलेल्या १४ डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. महायुतीमधील मित्रपक्ष शिवसेनेचे खातेवाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे.

गृहमंत्रिपद सोडण्यास नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी नगरविकास खाते मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय पर्यावरण या विभागाऐवजी पर्यटन विभागाचे मंत्रिपदही शिवसेनेच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात महायुतीची (Mahayuti) सत्ता येऊन जवळपास वीस दिवस उलटून गेले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या तिघांचा शपथविधी होऊ शकला आहे. मात्र, खातेवाटप अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यावरून विरोधकांकडून महायुतीवर टीका केली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्री सोडण्यास भाजपने नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याचे दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत गेलेले असतानाही शिंदे हे मात्र मुंबईत आहेत. त्यामुळे ठरलेल्या वेळी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का, असा सवाल विचारला जात होता.

Eknath Shinde
Sanjay Raut : पवारसाहेबांचे खासदार फोडा अन् मंत्रिपद मिळवा; केंद्रातील भाजपची अजित पवारांना ऑफर, राऊतांचा गौप्यस्फोट

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस आधी मंत्रिपदाच्या वादावर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांचे आवडीचे नगरविकास मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, भाजपने त्यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता होता.

भाजपने गृहमंत्रिपदाच्या बदल्यातन नगरविकास हे एकनाथ शिंदे यांच्या आवडीचे खाते सोडण्यास होकर दर्शविला आहे, त्यामुळे नगरविकास मंत्रिपद हे शिंदेंकडेच राहणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे पर्यावरण विभाग हा वर्षानुवर्षे शिवसेनेकडे होता. मात्र, शिंदेंना पर्यटन विभाग देण्यात येणार आहे, त्यामुळे शिंदे यांना नगरविकास हे आपल्या आवडीचे खाते मिळणार असले तर पर्यावरण हा विभाग भाजपला सोडावा लागणार असल्याची माहिती आहे.

Eknath Shinde
Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप ? शिंदे-फडणवीस तडकाफडकी दिल्लीत; अजितदादा नाराज ?

एकनाथ शिंदेंपुढे पेच

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. पण, त्यांच्याकडे मंत्रिपदाचे 20 ते 22 प्रबळ दावेदार आहेत. सगळ्यांना संधी मिळणे अशक्य आहे, त्यामुळे काहींना अडीच वर्षे, तर काहींना उर्वरीत अडीच वर्षे मंत्रिपदे देण्याचा विचार सध्या शिंदे गटात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com