RSS Dussehra 2023 Rally Nagpur : आज देशभरात विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते आहे. विविध राजकीय पक्ष, संघटनाही विजयादशमीचा सण साजरा करत आहेत. त्यानुसार राज्याची उपराजधानी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) वतीने भव्य पथ संचलनाचे आयोजन केले होते. यानंतर संघाचे सरसंघचालाक मोहन भागवत यांचे भाषण या वेळी झाले. या वेळी त्यांनी आपला देश अनेक क्षेत्रात प्रगती करत असून, निरंतरपणे पुढे जात आहे, अशी भावना व्यक्त केली. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोहन भागवत म्हणाले, "अलीकडील काळात प्रत्येक वर्षी भारतीयांचा गौरव वाढत आहे. असे अनेक प्रसंगांचे आपण साक्षीदार आहोत. G - 20 परिषदेतील भारतीयांची आदरतिथ्याची प्रशंसा आणि गौरव झाला आहे. आपल्या देशाचं एक महत्त्वाचं स्थान जगात आहे. आशियाई स्पर्धेतही भारताच्या खेळाडूंनी पदकं मिळवली. आपला देश सर्व क्षेत्रात पुढे जात आहे, जगात भारताचा मान सन्मान वाढत आहे."
"आपल्या देशाने गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना पुढे आणल्या. त्याचा लाभ गरिबांना झाला. हीच आपली नीती आहे. आपल्या संविधानाच्या पृष्ठावर ज्यांचं चित्र आहे, ते आपले राष्ट्रीय आदर्श भगवान रामाचं मंदिर अयोध्यात तयार होत आहे. रामलल्ला आपल्या मंदिरात २२ जानेवारीला प्रवेश करत आहेत. या प्रसंगाचे आपण साक्षीदार होणार आहोत," असे ही मोहन भागवत म्हणाले.
"22 जानेवारीला एकाच वेळी सगळे लोक जाऊ शकत नाही. सुरक्षेचा मु्द्दा असेल, हळूहळू नंतर आपल्या सुविधेनुसार जाऊ. त्या दिवशी आपल्या संपूर्ण देशात, आपापल्या ठिकाणी छोट्या मंदिरात धार्मिकतेचं असं वातावरण बनवू शकतो. भगवान राम हे धर्माच्या मर्यादेचं प्रतीक आहेत. करूणेचं प्रतीक आहेत. यामुळे आत्मिकतेचं, सर्वसमावेशकतेचे, समरसतेचे वातावरण, धार्मिकतेचं वातावरण असं देशात निर्माण होईल, असे छोटे छोटे कार्यक्रम आपण करू शकतो," असे आवाहनही भागवत यांनी केले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.