Sadavarte's criticism of Pawar : शरद पवार ज्याला खानदेश म्हणतात, ते आमच्या दृष्टीने उत्तर महाराष्ट्र आहे !

Nagpur : आम्हाला एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या निवडणुकीची फार चिंता नाही.
Gunratna Sadavarte and Sharad Pawar
Gunratna Sadavarte and Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gunwant Sadavarte in Nagpur : एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेतून बाजार बुणग्यांना कष्टकऱ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. म्हणून ही प्रक्रिया म्हणजे शरद पवारांच्या वैचारिक व्हायरसचे निर्जंतुकीकरण आहे. आम्हाला एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या निवडणुकीची फार चिंता नाही. मात्र स्वतंत्र विदर्भासाठी एसटी कामगार सहकारी बँकेचे मुख्यालय नागपुरात व्हावे, असे आमचे प्रयत्न असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. (For Vidarbha ST Kamgar Sahakari Bank should be headquartered in Nagpur)

आज (ता. १७) नागपुरात आले असता सदावर्ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आम्ही स्वतंत्र विदर्भवादी आहोत. लहान राज्यांची संकल्पना पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता. शरद पवार ज्याला खानदेश म्हणतात, मात्र आमच्या दृष्टीने ते उत्तर महाराष्ट्र आहे, असा टोला त्यांनी पवारांना हाणला.

आम्ही हे नाही म्हणत की पवारांची सटकली आहे. मात्र त्यांना वारंवार धडे द्यावे लागणार आहेत. काल पवारांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाचा अपमान झाला. शरद पवार हे ज्येष्ठ नेते नाही, ते फक्त वयोवृद्ध नेते आहे.

शरद पवारांना ज्येष्ठ नेता म्हणून आम्ही मानत नाही, त्यांना वयोवृद्ध म्हणून मानतो, असेही सदावर्ते म्हणाले. याच नागपूरमध्ये जेव्हा गोवारी मोर्चात चेंगराचेंगरी झाली. तेव्हा शरद पवार इथून विमानतळावर निघून गेले होते. त्यामुळे पवारांना आम्ही ज्येष्ठ नेते कसे मानू. ते फक्त वयोवृद्ध आहेत, असा घणाघातही त्यांनी केला.

Gunratna Sadavarte and Sharad Pawar
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; दिले थेट 'हे' आदेश

महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) गेलं आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) - देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. त्यानंतर आम्ही एसटी कामगारांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा आजही करत आहोत. महागाई भत्त्याच्या बद्दल आम्ही सर्वांना समानतेच्या स्तरावर आणले आहे. समानतेने बोनस दिले जात आहेत.

मागच्या सरकारने सिल्हवर ओकवर आंदोलन करणाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांना गुन्ह्यात अडकवले होते. मात्र देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) त्यांना पुन्हा नोकरी दिली आहे. एसटी कामगारांच्या शासनातील विलीनीकरणाची लढाई आम्ही पुढे ही लढत राहू, असा निर्धार गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.