

Mumbai : वकील गुणरत्न सदावर्ते यांची सनद बार कौन्सिलने काही दिवसांपूर्वी दोन वर्षांसाठी रद्द केली. त्यामुळे सदावर्ते यांना मोठा धक्का बसला. बार कौन्सिलच्या या निर्णयाविरूद्ध सदावर्तेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेवर गुणरत्न सदावर्तेंना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. बार कौन्सिलने केलेल्या या कारवाईविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे आदेश न्यायालयाने सदावर्तेंना दिले.
या सुनावणीवेळी सदावर्तेंना न्यायालयाने फटकारल्याचंही समोर आलं आहे. मीडिया माझी बदनामी करत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी न्यायालयात केला. मात्र, हायकोर्टासमोर बोलताना सदावर्ते यांची भाषा आक्रमक होती.
त्यामुळे त्यांना कोर्टाने दोन वेळा समज दिली. पण तरीही सदावर्तेंचा आवाज पुन्हा वाढला. न्यायालयाने सदावर्ते यांना फटकारताना म्हटलं की, ''मोठ्याने बोलू नका. तुम्ही प्रेससमोर नाहीत. कोर्टात दाद मागायला आलात याचं भान राखा'', अशा शब्दात सदावर्तेंना न्यायालयाने फटकारलं.
दरम्यान, गुणरत्न सदावर्तेंनी बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली. एका वकीलाच्या तक्रारीनंतर बार कौन्सिलने ही कारवाई केली. बार कौन्सिलच्या या कारवाईमुळे सदावर्तेंना मोठा धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.