Salil Deshmukh: सलील देशमुखांकडून काटोल-नरखेड मतदारसंघाबाबतचा सस्पेन्स कायम

Assembly Election 2024 : अनिल देशमुख 1995 पासून काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या दरम्यान 2014 च्या निवडणुकीत ते एकदाच पराभूत झाले होते. सुरुवातीला याच मतदारसंघावर सलील देशमुख यांनी दावा केला होता.
Anil Deshmukh  And Salil Deshmukh
Anil Deshmukh And Salil Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र तसेच नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षातर्फे घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीच्या बैठकीला हजेरी लावली आणि मुलाखतही दिली. मात्र, कुठून निवडणूक लढणार याचा सस्पेन्स त्यांनी कायम ठेवला आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) 1995 पासून काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या दरम्यान 2014 च्या निवडणुकीत ते एकदाच पराभूत झाले होते. सुरुवातीला याच मतदारसंघावर सलील देशमुख यांनी दावा केला होता. शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशमुखांच्या घरात मोठी खळबळ उडाली होती. आजही दोन्ही देशमुखांचा दावा काटोल मतदारसंघावर कायम आहे.

अनिल देशमुख 1995 पासून काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या दरम्यान 2014 च्या निवडणुकीत ते एकदाच पराभूत झाले होते. सुरुवातीला याच मतदारसंघावर सलील देशमुख यांनी दावा केला होता. शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशमुखांच्या घरात मोठी खळबळ उडाली होती. आजही दोन्ही देशमुखांचा दावा काटोल मतदारसंघावर कायम आहे.

सलील देशमुख काटोल विधानसभा मतदारसंघातील नवनवे प्रश्न घेऊन नेहमीच माध्यमांसमोर येत असतात. यावर त्यांनी आपला दावा सोडला नसल्याचे दिसून येते. मध्यंतरी शेजारच्या मोर्शी विधानसभा मतदारसंघातही चाचपणी केली. अनिल देशमुख चार दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वीतील अपघातग्रस्त कुटुंबाचे शिष्टमंडळ घेऊन माध्यमांसमोर आले होते. त्यावरून आर्वी विधानसभा मतदारसंघावरही देशमुखांचे लक्ष असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Anil Deshmukh  And Salil Deshmukh
Ajit Pawar : मोठी बातमी! बारामतीत अजित पवारांचा ताफा अडवला; 'हे' आहे कारण

सोमवारी अनिल देशमुख यांच्यासह सलील देशमुख दोघेही पक्षाच्या मुलाखतीला उपस्थित झाले होते. स्वतः शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. अनिल देशमुख यांनी यावेळी काटोल विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली.

देशमुख आपली बाजू मांडत असताना शरद पवारांनी हस्तक्षेप केला. तुम्हाला मुलाखत देण्याची गरज नसल्याचे सांगितले. दुसरीकडे सलील देशमुख यांनीसुद्धा मुलाखत दिली. मात्र त्यांनी कुठल्याच मतदारसंघाची मागणी केली नाही.

Anil Deshmukh  And Salil Deshmukh
Nana Patole : "शेतकऱ्यांप्रमाणे महायुती सरकार विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करत आहे" - नाना पटोले

वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करीत आहोत. विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे पक्षाने उमेदवारी द्यावी एवढीच विनंती त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली. पक्ष ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा आदेश देईल तेथून लढण्याची आपली तयारी असल्याचेसुद्धा सलील देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे ते नेमके कुठूण लढणार याचा सस्पेंस आणखीच वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com