Anil Deshmukh Politics: सलील देशमुखांचा तडकाफडकी राजीनामा, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कुटुंबात ‘गृहकलह'; पण कोणामुळे ?

Salil Deshmukh Resign : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. त्यांनी तब्येतीचे कारण सांगितले असले तरी त्यावर कोणाचाच विश्वास नाही.
Anil Deshmukh  And Salil Deshmukh
Anil Deshmukh And Salil Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. त्यांनी तब्येतीचे कारण सांगितले असले तरी त्यावर कोणाचाच विश्वास नाही. काटोल नगर पालिकेच्या निवडणुकीतील तिकीट वाटपावरून देशमुख कुटुंबात मोठा वाद झाला असल्याचे सांगण्यात येते.

आपल्याच विरोधात सातत्याने लढणाऱ्या राहुल देशमुख यांना आघाडीत का घेतले आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार का केले यावरून बाप-बेट्यांमध्ये मतभेद होते. त्यावरून रागाच्या भरात सलील देशमुख यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सलील देशमुख सक्रिय झाले होते. पक्षाच्या बैठकांमध्ये ते सहभागी झाले होते. जाग वाटपाच्या चर्चेतही ते होते. काँग्रेस दखल घेत नसल्याने राष्ट्रवादी समविचारी पक्षासोबत आघाडी करून लढणार असल्याचेही सलील देशमुख यांनी जाहीर केले होते. त्यावरून तब्येत हे राजीनाम्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येते. काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख (Anil Deshmukh) विरुद्ध शेकापचे वीरेंद्र देशमुख यांच्यात विधानसभेच्या निवडणुकीत अटीतटीचा सामना रंगत होता.

वीरेंद्र देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र राहुल देशमुख मैदानात उतरले आहेत. त्यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधातही निवडणूक लढली होती. २०२४च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी सलील देशमुख सुरुवातीपासूनच आग्रही होते. यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी निवेदनही दिले होते. त्याचे छायाचित्रही त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. त्यांनी आपला अंतिम निर्णय घरी कळविला होता. त्यावरून देशमुख कुटुंबीयांमध्ये गृहकलह निर्माण झाला होता.

Anil Deshmukh  And Salil Deshmukh
Mahayuti Politics: शाहांच्या भेटीनंतर महायुतीतला वाद मिटला की पेटला? बिहारवरुन फडणवीस-अजितदादा एका विमानानं तर शिंदे एकटेच मुंबईत परतले

शरद पवारांनी (Sharad Pawar) उमेदवारी अनिल देशमुख यांच्याच नावाने जाहीर केले होती. मात्र मुलाचा आग्रह आणि कुटुंबीयांच्या दबावामुळे त्यांनी माघार घेतली. सलील देशमुख काटोल-नरखेडमधून निवडणूक लढले. या निवडणुकीत भाजपचे चरणसिंग ठाकूर यांनी त्यांना पराभूत केले.

मात्र, या निवडणुकीत शेकापचे राहुल देशमुख हेसुद्धा उभे होते. त्यांनी आठ हजार मते घेतली. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला होता. राहुल देशमुख हे भाजपचे डमी उमेदवार होते. मतविभाजनासाठी त्यांना उभे करण्यात आले होते असा आरोप आहे.

Anil Deshmukh  And Salil Deshmukh
Prithviraj Chavan: 'मविआ' सरकार कोसळल्यानंतर ठाकरेंचं काय चुकलं हे छातीठोकपणे सांगणाऱ्या चव्हाणांनी आता दाखवून दिली शिवसेनेच्या वकिलाची कोर्टातली मोठी चूक

तेव्हापासूनच राहुल देशमुख यांच्यावर त्यांचा राग आहे. त्यातून नगर पालिकेच्या निवडणुकीत आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून राहुल देशमुख यांच्या नावाला त्यांनी कडाडून विरोध केला होता. अनिल देशमुख आणि सलील देशमुख यांच्यात याच कारणावरून बिनसले.

याच रागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येते. सलील देशमुख यांनी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपला राजीनामा पाठवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com