Salil Deshmukh On BJP: 'तुमच्याही कारनाम्यांचे फुटेज आमच्याकडे...'; सलील देशमुखांचा भाजप नेत्यांना इशारा

Anil Deshmukh Accident Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याला राजकीय स्टंटबाजी म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी चांगलेच सुनावले.
Saleel Deshmukh on bjp.jpg
Saleel Deshmukh on bjp.jpgSARKARNAMA
Published on
Updated on

Nagpur News: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याला राजकीय स्टंटबाजी म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनी चांगलेच सुनावले. तुमच्याही कारनाम्याचे व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत. तुमच्या घरात काय काय सुरू आहे, कोणी कोणाच्या गाडीला धडक मारली, त्यानंतर सीसीटीव्ही कसे बंद केले, फुटेज कसे गायब केले याचा उल्लेख करून त्यांनी भाजपच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे ते उघड करण्याचा इशारासुद्धा दिला.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेला हल्ला बनावट होता. तो राजकीय स्टंट होता, मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनीच तो घडवून आणला होता अशा प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. अनिल देशमुख यांनी फॉरेन्सिक रिपोर्ट यायच्या आधीच कोर्टात समोर सादर केल्यानं आश्चर्य व्यक्त करून पोलिसांवर राजकीय दबाव टाकल्याचा आरोप केला.

अनिल देशमुख यांनी याबाबत आपण फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी बोलू असेही सांगितले. पोलिसांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्याला अद्याप अटक केली नाही. हे त्यांचे अपयश आहे, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, त्यानंतरही भाजपच्या(BJP) नेत्यांमार्फत देशमुख यांच्या हल्ल्यावर टीकाटीपणी केली जात आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे

यावर सलील देशमुख म्हणाले, राहूल गांधी यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात मतचोरी झाल्याचे सांगितले आहे. ती कशी झाली याचेही पुरावे सादर केले आहेत. कामठीच्या मतदार यादीत परराज्यातील मजुरांची नावे कशी आलीत, अचानक मतदार कसे वाढले हे भाजपच्या नेत्यांनी सांगावे अशी विचारणा सलील देशमुख यांनी केली.

Saleel Deshmukh on bjp.jpg
Shahu Maharaj: शाहू महाराजांचा एकाचवेळी राज्य सरकार अन् जरांगेंना झटका; मराठा आरक्षणाबाबत धक्कादायक विधान,नव्या लढाईची घोषणा

काही दिवसांपूर्वी एक मोठा अपघात झाला होता. त्याच कुणाचा मुलगा होता, ती गाडी कोणाची होती, अपघाताची नोंद असताना कुठलीच कारवाई पोलिसांनी का केली नाही, त्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज कसे काय गायब झाले असा सवाल त्यांनी केला.

नागपूरच्या हिलटॉपवर राहणारा भाजपचा एक नेता नेहमीच विषयाशी संबंध नसताना कोणावरही आरोप करीत असतो. मीडियामध्ये आपले नाव कसे झळकेल यासाठी खटपट करीत असतो. नगरसेवक असताना त्याच्या मतदारसंघात कोटाल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे कशी आली हे त्याने आधी सांगावे त्यानंतर इतरांवर बोलावे असे खडे बोलही सलील देशमुख यांनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com