Yavatmal-Washim Constituency: संजय देशमुख की राजश्री पाटील? यवतमाळ-वाशिमकर कोणाला पाठवणार दिल्लीत

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency, Sanjay Deshmukh Vs Rajshree Patil: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत झाली आहे. या मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत.
Rajshree Patil Vs Sanjay Deshmukh
Rajshree Patil Vs Sanjay DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. गेल्या पाच टर्म यवतमाळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांना शिंदेसेनेत सामील होण्याचा निर्णय महागात पडल्याचं या निवडणुकीदरम्यान पाहायला मिळालं.

कारण गवळी यांनी या मतदारसंघावर दावा केला असतानाही त्यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांच्याऐवजी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीत चुरशीची लढत झाली आहे. या मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत. तर इथे शिवसेना विरद्ध शिवसेना अशीच थेट लढत झाली. त्यामुळे आता विजयाची माळ शिंदेच्या की ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे.

2008 मध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) भावना गवळी इथे खासदार आहेत. तर वाशिम लोकसभा मतदारसंघ असताना त्या 1999 आणि 2004 मध्ये विजयी झाल्या होत्या. मात्र, राज्यातील राजकीय समीकरणं बदलली शिंदेंनी बंड करत भाजपशी युती केली. आणि भावना गवळी यांनी देखील शिंदेंच्या सेनेत जाणं पसंत केलं. मात्र, ताई म्हणून लोकप्रिय असलेल्या भावना गवळींचा पत्ता 2024 च्या निवडणुकीतून कट झाला.

Rajshree Patil Vs Sanjay Deshmukh
Prasad Lad on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना भाजप नेते भेटणारच पण 'गेट वेल सून' म्हणण्यासाठी; प्रसाद लाडांचा टोला

तर महायुतीने सक्षम उमेदवार नसल्याने तिकीट कापलेले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना ऐनवेळी उभे करण्यात आले. पाटील आडनाव सर्वकाही सांगून जाते. कारण यवतमाळमध्ये जातीय समीकरण महत्त्वाचे ठरत आले आहे. म्हणूनच काँग्रेसचे उत्तमराव पाटील 6 वेळा विजयी झाले आहेत. हाच धागा पकडून राजश्री पाटील यांना पुढे करण्यात आले.

मागील दीड-दोन वर्षांत राज्यातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतला. तर राजश्री पाटील यांच्या विजयासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली. कमी वेळात जयश्री पाटील यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न महायुतीने केला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक संजय देशमुख यांनी उमेदवारी दिली. देशमुखांच्या मागे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थ साथ दिली. या मतदारसंघात बंजारा, एससी आणि मुस्लिम मतदारांचे प्रमाणही लक्षणीय आहे.

Rajshree Patil Vs Sanjay Deshmukh
Narendra Modi Banner : कोल्हापूर भाजपचा मंडलिकावर 'भरोसा' नाय का? थेट मोदींचेच अभिनंदन...

तसेच या मतदारसंघात कुणबी (पाटील) आणि बंजारा समाजाची मते अधिक आहेत. त्या पाठोपाठ अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींची आहेत. 2019 मध्ये जी समीकरणे होती, तशीच यावेळीही होती. परंतु, यावेळी जातींचे धुव्रीकरण होऊ शकले नाही. त्यामुळे ही निवडणूक एका कुणाच्याच बाजूने झुकली नाही हे विशेष आहे. तर आता यवतमाळ-वाशिमकर कोणाला दिल्लीत पाठवणार हे उद्याच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com