Prasad Lad on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना भाजप नेते भेटणारच पण 'गेट वेल सून' म्हणण्यासाठी; प्रसाद लाडांचा टोला

Prasad Lad Calling Uddhav Thackeray News Update: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याच्या वृत्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
Prasad Lad, Uddhav Thackeray
Prasad Lad, Uddhav Thackeray Sarkarnama

Prasad Lad Calling Uddhav Thackeray News Update: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याच्या वृत्ताने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. या फोनमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे लाड यांनी वेळ मागितल्याचा दावा करण्यात आला होता.

परंतु, काही वेळातच हे वृत्त खरं नसल्याचं लाड यांनी स्वत: सांगितलं. आपण ठाकरेंशी बोललो नाही हे सांगतानाच, भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतर आम्ही ठाकरेंना भेटणार आहोत पण त्यांना 'गेट वेल सून' म्हणण्यासाठी भेटणार आहोत, असा खोचक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.

महाराष्ट्राला अनपेक्षित राजकीय धक्के नवे नाहीत. शिवसेनेत (Shivsena) पडलेली फूट असो वा अजित पवारांनी शरद पवारांची सोडलेली साथ असो. असे अनेक राजकीय धक्के राज्यातील जनतेने पाहिले आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होणार? याकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. उद्या लोकसभा निवडणुकीत कोणाचा विजय होणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र निकालापूर्वीच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी वृत्त समोर आलं, ती म्हणजे भाजपच्या प्रसाद लाड यांनी ठाकरेंना फोन केल्याचं.

या वृत्तात भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी सोमवारी (ता.3) शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन करुन लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्याकडे सायंकाळी वेळ मागितल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु हा दावा प्रसाद लाड यांनी फेटाळला. शिवाय ठाकरेंसोबत आमचे टोकाचे मतभेद असून त्यांच्यासोबत एकत्र येणे शक्य नाही. तसेच देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंची यापूर्वीही गरज नव्हती, आजही नाही आणि भविष्यातही नसणार असंही लाड यांनी स्पष्ट केले.

Prasad Lad, Uddhav Thackeray
Lok Sabha Election Exist Poll: निकाल अवघ्या काही तासांवर 'एनडीए'बाबत राजकीय विश्लेषकाचा मोठा दावा

फोनचे वृत्त फेटाळतानाच त्यांनी उद्धव ठाकरेंना डीवचण्याचा प्रयत्न केला. लाड म्हणाले, "आम्ही उद्धव ठाकरेंना भेटणारच आहोत. परंतु, भाजपला लोकसभेच्या 400 पेक्षा जास्त मिळाल्यानंतर आपण उद्धव ठाकरेंना भेटून त्यांना 'गेट वेल सून' म्हणणार आहोत." अशा शब्दात लाड यांनी ठाकरेंना टोला लगावला. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाल्याचं दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com