Sanjay Gaikwad controversy : "नवीन कायदा नवीन हप्ता, महाराष्ट्र पोलिसांरखं अकार्यक्षम खातं..."; शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य

Sanjay Gaikwad On Maharashtra Police : "माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावा लागेल. पोलिस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही. त्यामुळे पोलिस हे आकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे सरदार आहेत."
Sanjay Gaikwad, Maharashtra Police
Sanjay Gaikwad, Maharashtra PoliceSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News, 26 Apr : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. अशातच आता त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही. छाप्यात 50 लाख पकडले तर ते 50 हजारच दाखवतात असं, वादग्रस्त वक्तव्य त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत (Police) केलं आहे.

Sanjay Gaikwad, Maharashtra Police
Ganesh Naik : "ठाणे आपलंच जिथं पाहिजे तिथं"; संपर्कमंत्रिपदी नियुक्ती होताच शिंदेंसेनेचा विरोध असलेल्या 'जनता दरबार'बाबत गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य

माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, "माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावा लागेल. पोलिस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही. त्यामुळे पोलिस हे आकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे सरदार आहेत.

चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा?"; असा सवाल करत त्यांनी पोलिसांवर संशय व्यक्त केला. तर याचवेळी त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले, "महाराष्ट्र पोलिस खात्यासारखं अकार्यक्षम खातं भारतात, जगात कुठेही नाही.

शासनाने कोणताही नवा कायदा केला की, यांचा एक हप्ता वाढतो. गुटखा बंदी केली तर गुटखा विकायचा आणि हप्ता वाढवायचा, दारू बंदीच्या बाबतीतही तसंच करायचं एक हप्ता वाढलायचा. पोलिसांनी इमानदारीने काम केलं तर जगातील सगळी गंदगी खतम होईल. फक्त त्यांनी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य केलं पाहिजे.

Sanjay Gaikwad, Maharashtra Police
Vasant More Shivsena : ठाकरे बंधू एकत्र येणार, पोटात गोळाच आला! तात्यांनी सांगितली टाळी वाजण्याची किती शक्यता

महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नाही. छाप्यात 50 लाख पकडले तर ते 50 हजारच दाखवतात असं."; असं आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी पोलिसांबाबत केलं आहे. दरम्यान, याआधीही त्यांनी विरोधी पक्षनेते राहूल गांधी आणि मतदारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देणार, असं वक्तव्य गायकवाड यांनी केलं होतं. या वक्तव्याप्रककरणी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com