Amravati News : रवी राणांना जोरात नडतोय कट्टर विरोधक; संजय खोडके बडनेरामध्ये पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, केली मोठी घोषणा

Amravati News : अमरावती जिल्ह्यात राणा दाम्पत्य विरुद्ध खोडके दाम्पत्य या दोघांमधील वाद सर्वश्रृत आहे. अशात रवी राणा यांच्या बडनेरा मतदारसंघात आपण निधी टाकणार असल्याची घोषणा खोडके यांनी केली आहे.
NCP MLC Sanjay Khodke announces development funds for Ravi Rana’s Badnera constituency, escalating the political rivalry in Amravati.
NCP MLC Sanjay Khodke announces development funds for Ravi Rana’s Badnera constituency, escalating the political rivalry in Amravati.Sarkarnama
Published on
Updated on

Amravati News : अमरावती जिल्ह्यात राणा दाम्पत्य विरुद्ध खोडके दाम्पत्य या दोघांमधील वाद सर्वश्रृत आहे. अगदी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना तिकीटच मिळू नये यासाठी प्रयत्न करण्यापासून ते तिकीट मिळाल्यानंतरही त्यांना पराभूत करण्यापर्यंत आमदार संजय खोडके यांनी सगळी ताकद वापरली होती. अशात रवी राणा यांच्या बडनेरा मतदारसंघात आपण निधी टाकणार असल्याची घोषणा खोडके यांनी केली आहे.

राष्ट्रवादीची अमरावती शहर कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार खोडके बोलत होते. यावेळी आमदार सुलभा खोडकेही उपस्थित होत्या. पण यामुळे खोडके यांनी अनेक वर्षांनंतर त्यांचा मोर्चा पुन्हा बडनेरा मतदारसंघाकडे वळवला आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघात अनेक वर्षांनंतर पुन्हा खोडके विरुद्ध राणा या वादाला नव्याने तोंड फुटण्याची शक्यता आहे.

खरंतर 2004 मध्ये सुलभा खोडके पहिल्यांदा बडनेरा मतदारसंघातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण 2009 आणि 2014 मध्ये रवी राणा यांनी सुलभा खोडके यांना पराभूत केले होते. 2019 मध्ये अमरावतीत भाजपच्या सुनील देशमुख यांच्याविरोधात काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. त्यावेळी सुलभा खोडके यांनी बडनेरा मतदारसंघाऐवजी अमरावतीमधून काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि निवडूनही आल्या.

NCP MLC Sanjay Khodke announces development funds for Ravi Rana’s Badnera constituency, escalating the political rivalry in Amravati.
Amravati News : भाजपसमोर आता तीनच पर्याय... 'संजय खोडकेंचा' एक डाव रवी राणा अन् नवनीत राणांना जड जाणार?

2024 च्या निवडणुकीपूर्वी बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे सुलभा खोडके पुन्हा राष्ट्रवादीत आल्या आणि अमरावतीच्या दुसऱ्यांदा आमदारही झाल्या. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी संजय खोडके यांनाही विधान परिषदेचे आमदार केले. आता याच आमदारकीचा वापर करत बडनेरा मतदारसंघात निधी देण्याची घोषणा खोडके यांनी केली आहे. त्यामुळे बडनेरामध्ये अनेक वर्षांनंतर पुन्हा खोडके विरुद्ध राणा यांच्यातील वाद पाहायला मिळणार आहे.

NCP MLC Sanjay Khodke announces development funds for Ravi Rana’s Badnera constituency, escalating the political rivalry in Amravati.
Navneet Rana News: लोकसभेचा वचपा काढण्यासाठी नवनीत राणांची मोठी घोषणा; मित्रपक्षांची धडधड वाढवली

महापालिका निवडणूक स्वबळावर लढवू :

यावेळी महापालिका निवडणुकीतही राणा दाम्पत्याला विरोध करण्याची भूमिका खोडके यांनी घेतली आहे. भाजपकडून आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची भाषा केली जात आहे. पण आमचा भाजपसोबत युती करण्याला विरोध नाही. मात्र भाजपचा घटक पक्ष युवा स्वाभिमान जर या युतीमध्ये असेल तर आम्ही 200 टक्के स्वबळावर लढू. युवा स्वाभिमान पक्षाशी आम्ही संघर्ष केला आहे. मात्र युतीच्या नावावर आम्ही त्यांना सहन करणार नाही, असेही खोडके यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com