Devendra Fadnavis News : म्हणून मुख्यमंत्री झालेले फडणवीस परत म्हणाले,'मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन आणि..'

Devendra Fadnavis in Pune : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजनांच्या वक्तव्यांचाही केला उल्लेख; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?
Devendra Fadnavis 1
Devendra Fadnavis 1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: महाराष्ट्र विधानसभेच्या 2019च्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल असा नारा निवडणूक प्रचारादरम्यान दिला होता. त्यानंतर काही कारणास्तव 2019 मध्ये भाजपच्या हातातून सत्ता निसटली आणि दिलेल्या या नाऱ्याची विरोधकांनी मजा घेतली. परंतु त्यानंतर अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा भाजपा सत्तेत आली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा हाच नारा दिला होता.

आता 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने(BJP) मोठा बहुमत प्राप्त केलं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यात पहिल्यांदाच आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईला हा नारा परत एकदा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त पुण्यात आले होते.

या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय आनंद आहे. पुणे पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या परवाच्या उद्घाटनाला देखील मी उपस्थित आहे. पहिला पर्वचे उद्घाटन देखील माझ्याच हस्ते झाले होते. मात्र प्रमोद महाजन(Pramod Mahajan) असं नेहमी म्हणायचे सुज्ञ माणसाने एका कार्यक्रमात दोनदा जाऊ नये, कारण मागच्या वेळेस जे बोलला ते जर परत बोलला तर म्हणतात पहा मागच्या वेळी देखील यांनी हेच भाषण केलं होतं आणि यावेळी वेगळं बोलला तर म्हणतात काही अर्थ नाही मागच्या वेळेस वेगळे बोलला होता आता वेगळं बोलत आहेत. पण हा कार्यक्रमाच इतका चांगला आहे की मला म्हणावसं वाटतं 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि दरवर्षी येईन.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले यानंतर उपस्थितांनी मोठ्याप्रमाणात टाळ्या वाजवत जल्लोष केला.

Devendra Fadnavis 1
Devendra Fadnavis : पुण्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी की भाजपच्या वाट्याला ? मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' उत्तर

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, 'माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक तक्रार आहे की या या पुस्तक महोत्सव तुम्ही मला बोलवता फिरवता वेगवेगळे पुस्तक देता पण त्याच वेळेस समोर खाद्य महोत्सव देखील सुरू असतो त्याच्याकडे तुम्ही पाहात देखील नाहीत तो रस्ता देखील मला दाखवत नाहीत तो मांडव देखील मला पाहू देत नाहीत, पुढच्या वेळेस हा देखील अन्याय दूर करा खाद्यमहोत्सवासाठी वेळ राखीव ठेवा.' अशी मिश्किल टिपणी देवेंद्र फडणीस यांनी केली.

Devendra Fadnavis 1
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! लखनऊ कोर्टाने 'या' प्रकरणात बजावले समन्स

याचबरोबर पुस्तक महोत्सवासाठी पुण्यापेक्षा दुसरे उपयुक्त शहर असूचं शकत नाही. या उपक्रमाला पुढे घेऊन जाण्यासाठी जी मदत लागेल ती शासन म्हणून आम्ही करू. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com