Narhari Zirwal and Aditi Tatkare : मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ अन् आदिती तटकरेंना फोन!

Fadanvis Goverment Cabinet Expansion : फडणवीस सरकारचा उद्या शपथविधी होणार; अनेक आमदारांची नावे चर्चेत पण कुणाला मिळणार संधी?
Narhari Zirwal and Aditi Tatkare
Narhari Zirwal and Aditi Tatkaresarkarnama
Published on
Updated on

NCP MLA Narhari Zirwal and Aditi Tatkare News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत पुन्हा एकदा आले आहे. तर मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस विराजमन झाले असून, उपमुख्यमंत्रिपदी एकनात शिंदे आणि अजित पवार यांची वर्णी लागली आहे. ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मात्र, फडणवास सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त काही लागत नव्हता.

यावरून विरोधकही सरकारवर टीका, टिप्पणी करत होते. शिवाय, मंत्रिपदावरू महायुतीत बिनसलं असल्याचंही विरोधकांकडून सांगितलं जात होतं. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस अन् उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे दिल्लीत कायम दिसत होते. तर एकनाथ शिंदे हे मुंबईतच असल्याने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. या सगळ्या घडामोडींमध्ये अखेर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागला.

आता रविवार १५ डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षाकडून आपल्या आमदारांची नावे मंत्रिपदासीठी निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी प्राप्त माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी मंत्रिपदासाठी नरहरी झिरवळ आणि आदिती तटकरे यांना पहिला फोन गेला आहे. याशिवाय अनिल पाटील यांचही नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालं असल्याचं सांगितलं जात आहे.

Narhari Zirwal and Aditi Tatkare
Devendra Fadnavis News : म्हणून मुख्यमंत्री झालेले फडणवीस परत म्हणाले,'मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन आणि..'

याशिवाय शिवसेनेकडून(Shivsena) उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यासह संजय शिरसाट यांचं नाव निश्चित असल्याचं बोललं जात आहे. मात्र शिवसेनेकडून अद्याप याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

Narhari Zirwal and Aditi Tatkare
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! लखनऊ कोर्टाने 'या' प्रकरणात बजावले समन्स

तर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) सरकार 3.0च्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे ३५ पेक्षा जास्त आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. तर कोणत्या पक्षाकडून किती आमदार पहिल्या टप्प्यात मंत्रिपदाची शपथ घेणार याबाबत अद्याप कोणताही अधिकृत आकडा समोर आलेला नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com