Rajendra Shingne News: पवारांचे निष्ठावंत शिंगणे आता म्हणतात, 'दादां'ना मुख्यमंत्री होण्यापासून 'काका'ही रोखू शकत नाहीत

Sharad Pawar Vs Ajit Pawar: 'अजितदादा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष'; डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या दाव्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar and Ajit Pawar,  Rajendra Shingne
Sharad Pawar and Ajit Pawar, Rajendra ShingneSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News: "काहीही झाले तरी अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत", असे ठाम मत 'दादां'चे 'काका' शरद पवार यांनी अकोल्यात दौऱ्यावर असताना व्यक्त केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ‘काका’ जे म्हणतात तेच होते, असे मानले जाते. मात्र, ‘दादां’ना मुख्यमंत्री होण्यापासून ‘काका’ही रोखू शकत नाहीत, असे नाव न घेता स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

सिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगाव राजा येथे कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या पुढाकारानं आयोजित मेळावा व कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आले असता डॉ. शिंगणे यांनी काका-पुतण्याच्या या वादात उडी घेतली.

Sharad Pawar and Ajit Pawar,  Rajendra Shingne
Ajit Pawar Pune : पालकमंत्री अजितदादांच्या कामाचा धडाका सुरू; अधिकारीही झाले 'चार्ज'!

अजितदादा स्वकर्तृत्त्वाने जादुई आकडा गाठतील

‘अजितदादा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे’, असं डॉ. शिंगणे या वेळी म्हणाले. ते कधी व कसे मुख्यमंत्री होतील हे संपूर्ण महाराष्ट्र बघेल. दादा नेहमी म्हणतात की, विधानसभा निवडणुकीत १४५ चा जादुई आकडा गाठेल त्याचाच मुख्यमंत्री होईल, हे निश्चित असते. त्यामुळे दादा स्वकर्त्वृत्वाने भविष्यात हा जादुई आकडा गाठेल, असा विश्वास आमदार डॉ. शिंगणे यांनी व्यक्त केला.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांसमोर आल्यानंतर अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली व अजित पवारांसह आमदारांचा मोठा गट सरकारमध्ये सामील झाला. अगदी शरद पवारांचे विश्वासू सहकारीही दादांसोबत गेल्याने पवारांला मोठा हादरा बसला.

विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गट अडचणीत सापडलाच तर ‘बॅक अप प्लॅन’ म्हणून भाजपजवळ अजित पवार गट आहे, असे बोलले जाते. त्यामुळे शिंदे यांचा पत्ता कट झाल्यास अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

स्वप्न स्वप्नच राहिल

भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील योग्य वेळ आली की, अजितदादा मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य करत राजकीय खळबळ उडवून दिली होती. परंतु ‘दादां’चे ‘काका’ यांना फडणवीस यांच्या शब्दांवर विश्वास नाही. अजित पवार हे मुख्यमंत्री होऊच शकत नाही. मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न, स्वप्नच राहिलं, असं पवार अकोल्यात म्हणाले होते. त्यावर आता डॉ. शिंगणे यांनी वक्तव्य करत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरुवात करून दिली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Sharad Pawar and Ajit Pawar,  Rajendra Shingne
Ajit Pawar News: पालकमंत्री होताच अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर; पिंपरी-चिंचवडमधील कामांचा 24 तासांत घेतला आढावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com