Sharad Pawar News : राज्यात पुन्हा नवीन समिकरण? पवार अन् प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत झाली 'ही' चर्चा

Sharad Pawar, Prakash Ambedkar : शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची नुकतीच भेट झाली.
Sharad Pawar, Prakash Ambedkar
Sharad Pawar, Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar, Prakash Ambedkar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची नुकतीच मुंबईत भेट झाली होती. त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली, हे पवार यांनी सांगितले.

शरद पवार आज (ता. 23) अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. अमरावतीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. या वेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

Sharad Pawar, Prakash Ambedkar
Uddhav Thackeray : उष्माघातामुळे मुंबईत नको ते घडलं; उन्हामुळे उद्धव ठाकरेंनी 10 मिनिटात आटोपला कार्यक्रम

या पत्रकार परिषदेमध्ये पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. राज्यातले सरकार पाडले, सर्वोच्च न्यायालयाने जर 16 आमदारांना अपात्र ठरवले तर अजित पवार यांना फोडण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर पवार म्हणाले, ''उद्या कुणी फोडण्याची भूमिका घेत असेल तर ती त्यांची भूमिका असेल. मात्र, त्यावर आम्हाला काय भूमिका घ्यायची आहे, ती आम्ही भक्कम पणे घेऊ. मात्र, ती भूमिका काय असेल ते आताच सांगता येणार नाही. कारण याबाबत आम्ही चर्चाच केलेली नाही,'' असे पवार यांनी स्पष्ट केले.

दरन्यान, त्यांना यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्याशी झालेल्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पवार म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेथे राष्ट्रावादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांनीही काही उमेदवार उभे केले आहेत. ते आणि आम्ही लढणाऱ्या जागा वेगवेळ्या असतील तर सहकार्य करता येईल का? याबाबत चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.

Sharad Pawar, Prakash Ambedkar
Sharad Pawar News : फोडाफोडीच्या राजकारणावर पवार स्पष्टच बोलले; कुणी फोडाफोडी करणार असेल तर आम्ही भक्कम पणे...

प्रकाश आंबेडकर त्यांच्या उमेदवारांच्या याद्या माझ्याकडे पाठवणार आहेत. आमच्या उमेदवारांची यादी त्यांना देण्यात येईल, यानंतर आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ, असेही पवार म्हणाले. 2024 च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत वंचित असेल का? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, सध्या फक्त आमची कर्नाटकसंदर्भात चर्चा झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com